baramati bus stand: बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक, १ कोटींचे बक्षीस!

baramati bus stand: बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक, १ कोटींचे बक्षीस!

baramati bus stand :बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक, १ कोटींचे बक्षीस!
बारामती (प्रतिनिधी): ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान २०२५’ अंतर्गत ‘अ’ वर्गीय बसस्थानकांमध्ये बारामती बसस्थानकाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबद्दल बारामती बसस्थानकाला १ कोटी रुपयांचे बक्षीस आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, “बारामती बसस्थानकाने स्वच्छता, शिस्त, नियोजन आणि उत्कृष्ट व्यवस्थापनातून संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. हे यश प्रत्येक बारामतीकरासाठी अभिमानाचा क्षण आहे.”
त्यांनी आगारातील चालक, वाहक, यांत्रिक, प्रशासकीय व पर्यवेक्षकीय कर्मचारी यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. या यशाचे श्रेय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीला आणि विकासकामांना दिले जाते. आधुनिक वक्राकार छत, सुंदर बाग, स्वच्छता आणि प्रवाशांसाठी उत्तम सुविधा यामुळे बारामती बसस्थानक वेगळे ठरले.
१ जून २०२६ रोजी मुंबईत गौरव सोहळा
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल १ जून २०२६ रोजी मुंबई येथे परिवहन मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.
MSRTC च्या या अभियानात स्वच्छता, शौचालय देखभाल, सौंदर्यीकरण, हरियाळी, प्रवासी सुविधा आणि कर्मचारी सहभाग यासह विविध निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. बारामती बसस्थानकाने ९७ गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले.बारामतीकरांसह राज्यातील प्रवाशांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. अनेकांनी इतर व्यस्त बसस्थानके (जसे स्वारगेट, पुणे स्टेशन) सुधारण्याची मागणीही केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post