हडपसर (पुणे): मुलीवरून मुलांमध्ये रंगला 'हायव्होल्टेज ड्रामा'; वाद मिटवायला बोलावून भावाच्या पाठीत खुपसला कोयता!hadapsar news today
ब्युटीपार्लरला गेलेल्या बहिणीच्या मैत्रिणीवरून सुरू झालेला मुलांचा वाद थेट कोयत्याच्या रक्ताळलेल्या हल्ल्यापर्यंत पोहोचला आहे. हडपसरमधील गोंधळे नगर येथे वाद मिटवण्याचा बहाणा करून दोन सख्ख्या भावांना गाठून रक्तबंबाळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नेमकी भानगड काय? २२ ऑगस्टला बहीण मैत्रिणीसोबत ब्युटीपार्लरला गेली आणि परत आली. यावरून चैतन्य महाडिकने मैत्रिणीचा भाऊ आदित्य दळवी याला थेट फोन लावला. "माझी बहीण तुझ्या बहिणीसोबत का गेली?" यावरून दोघांत फोनवरच चांगलीच ठिणगी पडली.
वाद मिटवायचा आहे म्हणून आदित्यच्या मित्राने चैतन्यला १ सप्टेंबरच्या रात्री गोंधळे नगरला बोलावलं. तिथे चैतन्य आपल्या मोठ्या भावासोबत पोहोचताच आदित्य, ओंकार ताकवले, ओंकार सावंत आणि 'उंबऱ्या' उर्फ ओंकार भोईटे दबा धरून बसले होते.
डोक्यात वार आणि पाठीत कोयता! दोन्ही भावांना आधी लाथाबुक्क्यांनी तुडवलं. त्यानंतर उंबऱ्याने विकीच्या हातावर वार केला. चैतन्य पळायला लागताच आदित्य आणि सावंतने त्याला पकडून ठेवून डोक्यात काहीतरी मारलं, तर ओंकार ताकवलेने कमरेचा धारदार कोयता काढून चैतन्यच्या पाठीवर सपासप तीन वार केले! रक्तबंबाळ झालेल्या भावांना ससूनमध्ये नेऊन पाठीवर टाके घालावे लागले आहेत.
हडपसर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.