farmar News : दुष्काळात पदरात पडले फक्त ५००० रुपये; बळीराजाचा सवाल— "यात साधी भाऊबीज तरी साजरी होईल का साहेब?

  farmar News :  दुष्काळात पदरात पडले फक्त ५००० रुपये; बळीराजाचा सवाल— "यात साधी भाऊबीज तरी साजरी होईल का साहेब ?


ऐन सणासुदीच्या तोंडावर दुष्काळाच्या होरपळीत जगणाऱ्या बळीराजासाठी सरकारने जाहीर केलेली मदत पाहून शेतकऱ्यांमध्ये संतापाचा मोठा भडका उडाला आहे! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून केवळ ५ हजार रुपयांची तुटपुंजी मदत मिळणार असल्याची चर्चा रंगताच, ग्रामीण भागात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

सध्या बाजारात महागाईने उच्चांक गाठला असताना ५ हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार? ५०० रुपयांत तर आज एक किलो चांगला गोडधोड फराळ किंवा मुलांसाठी साधा एक कपडाही नीट येत नाही, तिथे ५ हजार रुपयात खत, बी-बियाणं, कर्जाचा हप्ता फेडायचा की घर चालवायचं? असा थेट आणि संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.

"आम्ही कोरडा दुष्काळ सोसून मातीत घाम गाळायचा आणि सरकारने आमच्या हातात एवढी चिल्लर टेकवायची?" अशा शब्दांत सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. एका बाजूला राजकीय घोषणांचे फटाके, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या घरात मात्र या ५ हजार रुपयांच्या मदतीमुळे नाराजीचा अंधारच दिसत आहे.

👉 सरकारची ही ५००० रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा वाटते का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा!

Post a Comment

Previous Post Next Post