पुणे: पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबार आणि कोयता हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे.

नेमका काय आहे हा ट्विस्ट?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदार किवळेवर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याचा संपूर्ण कट अक्षय चव्हाण याने रचला होता.
बदला घेण्यासाठी रचला कट: २० एप्रिल २०२५ रोजी जमिनीच्या वादातून शुभम चव्हाणची हत्या झाली होती.
या खून प्रकरणात मंदार किवळे हा मुख्य आरोपींपैकी एक होता. जामिनावर सुटताच पाळत: मंदार किवळे अवघ्या काही दिवसांपूर्वीच जामिनावर कारागृहाबाहेर आला होता.
तो बाहेर पडताच अक्षय चव्हाणने १२ ते १५ तरुणांना एकत्र करून त्याची रेकी केली आणि सुपारी देऊन हा हल्ला घडवून आणला.
नेमकं काय घडलं होतं?
न्यायालयीन कामकाजासाठी मंदार किवळे शिवाजीनगर कोर्टाच्या परिसरात आला असताना ६ जणांच्या टोळीने त्याला गाठले.
पोलिसांची धडाकेबाज कारवाई
घटनेनंतर पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी तात्काळ पथके रवाना केली.