छत्रपती शाहु महाराज माहीती [Chhatrapati Shahu Maharaj Information Marathi]

 

छत्रपती शाहु महाराज माहीती [Chhatrapati Shahu Maharaj Information Marathi]
छत्रपती शाहु महाराज माहीती 

छत्रपती शाहुमहाराज माहीती [ Chhatrapati Shahu Maharaj Information Marathi ]


जेव्हा ब्रिटीश राजसत्तेच्या काळात सामान्य जनतेवर अन्याय केला जात होता.तेव्हा सामान्य जनतेला न्याय मिळावा ह्यासाठी तसेच बहुजन समाजाची प्रगती व्हावी ह्याकरीता अहोरात्र प्रयत्न करणारे,झटणारे सामाजिक कार्यकर्ते तसेच समाजसुधारक म्हणजे छत्रपती शाहु महाराज.

छत्रपती शाहु महाराज यांचा दलित आणि मागासवर्गीय जनतेच्या विकासामध्ये खुप महत्वाचा वाटा होता.आणि शाहु महाराज यांना राजर्षी ही पदवी कानपुर येथील एका दलित तसेच मागासवर्गीय कुर्मी समाजाच्या वतीने देण्यात आली होती.

आजच्या लेखातुन आपण छत्रपती शाहु महाराज यांच्याविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

छत्रपतीशाहु महाराजकोण होते?

छत्रपती शाहु महाराज यांना राजर्षी शाहु महाराज असे देखील म्हटले जाते.शाहु महाराज कोल्हापुर राज्याचे प्रमुख जयसिंगराव घाटगे तसेच राधाबाई यांचे पुत्र होते.छत्रपती शाहु महाराज यांचे मुळ नाव यशवंतराव असे होते छत्रपती शाहु महाराज हे एक राज्यकर्ते,लोकनेते,सामाजिक कार्यकर्ते तसेच समाजसुधारक देखील होते.

 

छत्रपतीशाहु महाराजयांचाजन्म कोठेआणि केव्हाझाला?

26 जुन 1874 रोजी छत्रपती शाहु महाराज यांचा जन्म झाला होता.शाहु महाराजांचा जन्म हा कोल्हापुरातील कागल नावाच्या गावी घाटगे कुटुंबामध्ये झाला होता.

छत्रपतीशाहु महाराजांच्याआईचे आणिवडीलांचेनाव कायहोते?

छत्रपती शाहु महाराज यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे असे होते जे कोल्हापुर राज्याचे प्रमुख देखील होते.आणि शाहु महाराज यांच्या आईचे म्हणजेच जयसिंगराव घाटगे यांच्या पत्नीचे नाव राधाबाई असे होते.

 छत्रपतीशाहु महाराजयांच्यापत्नीचेनाव कायहोते ?

छत्रपती तसेच राजर्षी शाहु महाराज यांच्या भार्येचे नाव लक्ष्मीबाई खानविलकर(भोसले)असे होते. शिक्षण चालु असतानाच त्यांचा विवाह बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या मुलीशी 1891 मध्ये त्यांचा विवाह झाला होता.तेव्हा शाहु महाराज हे 17 वर्षाचे होते आणि लक्ष्मीबाई ह्या 11 वर्षाच्या होत्या.

छत्रपतीशाहु महाराजयांनाकिती मुलेतसेच मुलीहोत्या ?

छत्रपती शाहु महाराज यांना दोन मुले आणि दोन मुली होत्या.ज्यात त्यांच्या मुलांचे नावे राजाराम आणि शिवाजी असे होते. मुलींचे नाव राधाबाई आणि आऊबाई असे होते.

छत्रपतीशाहु महाराजांचाराज्याभिषेककोठे आणिकेव्हाझाला होता ?

ad

छत्रपतीशाहु महाराज यांचा राज्याभिषेक 2 एप्रिल 1894 मध्ये झाला होता आणि 1922 पर्यत म्हणजेच तब्बल 28 वर्षे शाहु महाराज यांनी कोल्हापुर संस्थानाच्या राजाचे पद सांभाळले होते.

छत्रपतीशाहु महाराजांचेगुरू कोणहोते ?

छत्रपती शाहु महाराज यांचे शिक्षण हे राजकोट तसेच धारवाड ह्या ठिकाणी झाले होते.तेथेच त्यांना

सर फ्रेझर आणि रघुनाथराव सबनीस यांच्यासारखे गुरू प्राप्त झाले होते.

छत्रपतीशाहु महाराजयांचीवंशावळकोणकोणती ?

1891 मध्ये शाहु महाराजांनी बडोद्याचे गुणाजीराव खानविलकर यांच्या मुलीशी लक्ष्मीबाईशी लग्न केले.लक्ष्मीबाईपासुन त्यांना चार अपत्य झाली त्यात दोन मुली दोन मुले होते.त्यानंतर शाहु महाराज यांच्या वडिलांच्या जागी तिसरे राजाराम कोल्हापुरचे राजा बनले.

 

यानंतर देवासच्या महाराणी राधाबाई यांचे देवासचे महाराजा तुकडोजीराव यांच्याशी लग्न होते.मग त्यांना विक्रमसिंह नावाचा पुत्र होतो जो पुढे जाऊन 1837 मध्ये देवासचा महाराजा बनतो.आणि कोल्हापुरचा दुसरा शहाजी म्हणुन गादीवर बसतो.विक्रमसिंह यांना अजुन एक मुलगा तसेच मुलगी असते ज्यांचे नाव कुमार शिवाजी आणि औबाई असे असते.पण औबाई ह्यांच नंतरून निधन होत असते.

छत्रपतीशाहु महाराजयांनीकोणकोणतीकार्येकेली ?

छत्रपती शाहु महाराज हे फक्त एक राजा नव्हते.शाहु महाराज हे दुरदृष्टी नेता तसेच समाजसुधारक देखील होते.शाहु महाराज यांनी अनेक क्षेत्रात कार्ये केली ज्यात सामाजिक,शैक्षणिक,राजकीय अशा अनेक क्षेत्रांत आपले महत्वाचे योगदान दिले होते.

1) शैक्षणिक कार्य :

शाहु महाराजांनी बहुजन समाजासाठी शिक्षण क्षेत्रात अनेक महत्वपुर्ण कार्ये केली.शाहु महाराजांना बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रचार तसेच प्रसार केला.त्यांनी कोल्हापुर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत तसेच सक्तीने देण्यास सुरूवात केली.जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविणार नाही त्यांच्याकडुन दंड वसुल करण्यास सुरूवात केली.यामागे त्यांचा एकच मुख्य हेतू होता तो म्हणजे सर्व मुलांना मोफत शिक्षण मिळावे. स्त्रीयांना देखील शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी शैक्षणिक जागृती केली.तसेच त्यासाठी काही सक्तीतीचे कायदे देखील तयार केले.गरीब वस्तीमध्ये जिथे 500 ते 1000 लोकसंख्या असेल अशा गावांमध्ये शाळा सुरू केल्या.

2) सामाजिक कार्य :

शाहु महाराजांच्या काळात समाजामध्ये स्पृश्य तसेच अस्पृश्य असा भेदभाव केला जायचा त्यामुळे हा भेदभाव कायमचा नष्ट करण्यासाठी शाहु महाराज यांनी स्पृश्य तसेच अस्पृश्य यांच्या वेगळया शाळा भरवण्याची प्रथा कायमची बंद केली.

 

समाजामधील जातीभेद दुर व्हावा यासाठी शाहु महाराजांनी आंतरजातीय विवाहाची मान्यता देणारा कायद्याला मंजुरी देखील दिली.

समाजामध्ये स्त्रियांना पतीच्या निधनानंतर पुन्हा विवाह करण्याचा अजिबात अधिकार नव्हता त्यांना आयुष्यभर विधवेचा रूपात आपले संपुर्ण जीवण व्यतीत करावे लागायचे.म्हणुन 1917 मध्ये विधवांना पुन्हा विवाह करता यावा म्हणुन शाहु महाराज यांनी समाजातील विधवांचे पुनर्विवाह घडवून आणण्यासाठी विधवा विवाहाच्या कायद्याला मान्यता प्राप्त करून दिली.

अस्पृश्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचा निर्णय घेतला.याचसाठी त्यांनी अस्पृश्यांना स्वताचा उद्योग,व्यवसाय सुरू करण्यास सांगितले आणि ज्यांच्याकडे स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल नव्हते त्यांना आर्थिक मदत देखील शाहु महाराजांनी केली.

असपृश्याना स्वता शिवण यंत्रणे उपलब्ध करून देऊन स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.त्यांना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी राजवाडयातील कपडे त्यांच्याकडुनच शिवून घेण्यास सुरूवात केली.गंगाधर कांबळे नावाच्या अस्पृश्य समाजातील तरुणाला कोल्हापुरच्या वस्तीमध्ये स्वताचे चहाचे दुकान टाकुन दिले.

अशा पदधतीने शाहु महाराजांनी सामाजिक कल्याणासाठी तसेच समाजाच्या उदधारासाठी अनेक सामाजिक तसेच शैक्षणिक कार्ये केलीत.म्हणुन जनतेने त्यांना राजर्षी लोकनेते अशी पदवी बहाल केली होती.

अंतिमनिष्कर्ष: अशापदधतीनेआजआपणराजर्षीछत्रपतीशाहुमहाराजयांच्याविषयीमाहीतीजाणुनघेतलीआहे.आपल्याला ही माहीती कशी वाटली याबाबद आपली प्रतिक्रिया नक्की आम्हास कळवा.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top