श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्ये – Characteristics of rainfall in Shravan
श्रावण महिना सामान्यपणे व्यतीत करणे चुकीचे ठरते. यात बदलाची, परिवर्तनाची झलक असते. याचा आपणही उपयोग करून घेतला पाहिजे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. परिवर्तन हे शिव आहे. जुनाट विचार, चुका या विसरुन नाविन्याची कास धरून पुढे जायला हवे. नव्याने गोष्टींची सुरुवात करायला हवी. श्रावणाचा उत्साह, ऊर्जा मनाला रुंजी घालत नसल्यास अद्याप शिव खूप दूर आहेत, असे समजावे. शिवाप्रमाणे नकारात्मकता, निराशा, नैराश्य यांचे विष पिऊन सकारात्मकता, आनंद, सुख, समाधान, शांतता यांचे शाश्वत अमृत अनुभवण्याचा आणि वाटण्याचा प्रयत्न करावा. श्रावणाची गुणवैशिष्ट्ये अंगात भिनवण्याचा प्रयत्न करा. तरच शिवापर्यंत पोहोचण्याचा खडतर मार्ग सुकर होऊ शकतो.