संगणक एक कल्पवृक्ष | Marathi Nibandh

 

संगणक एक कल्पवृक्ष | Marathi Nibandh 

सध्याच्या काळामध्ये शिक्षित आणि अशिक्षित या ही संकल्पना बदलून गेलेल्या आहेत. ज्या व्यक्तीला संगणकाचे ज्ञान नाही त्या व्यक्तीला सध्याच्या काळामध्ये अशिक्षित संबोधले जाते. यावरून सध्याचे युग, म्हणजे संगणकाचे युग आहे असेच म्हणावे लागेल ही गोष्ट सर्वानी मान्य देखील केलेले आहे.

संगणकामुळे मानवाच्या जीवनाला फार मोठ्या प्रमाणामध्ये गती मिळालेली आहे. संगणकाचा शोध ज्या वेळी लागला त्यावेळी संगणकाचा उपयोग फक्त गणन क्रिया करण्यासाठी होत असे. त्यानंतर जसजसा काळ गेला तसा संगणकामध्ये गरजेनुसार मानवाने बदल केले. मानवाच्या जीवनामध्ये संगणक म्हणजे मुलभूत गरज बनलेली आहे.

संगणकामुळे काम करण्यासाठी लागणाऱ्या वेळेची मोठ्या प्रमाणामध्ये बचत झालेली आहे. माणसाचे कष्ट वाचल्यामुळे त्याची काम करण्याची शक्तीही वाढलेली आहे.

ज्यावेळी माणसांना पहिल्यांदा संगणकाची ओळख झाले त्यावेळी बऱ्याच लोकांना म्हणजे मोठे संकट आहे .असे वाटले होते संगणकामुळे रोजगार वाढतील आणि बेकार होतील अशी भिती अनेकांनी व्यक्त केली. सुरुवातीला निर्माण झालेली ही भीती मात्र फार काळ टिळली नाही. संगणकामुळे रोजगाराच्या देखील अनेक संधी उपलब्ध झाल्यात अट एक एकच होती की संगणकाचे ज्ञान मिळवून घेणे संगणक वापरण्याची कला शिकून घेणे.

संगणकाचे ज्ञान शिकून घेणाऱ्यांनी बुद्धीच्या जोरावर आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सहजरिल्या सोडवल्याचे बन्याय ठिकाणी आता दिसून येते संगणकामुळे कामांमध्ये शिस्त आली कोणतेही काम अतिशय वेगाने अचुक पद्धतीने कारणे हे संगणकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणावे लागेल.

संगणकामुळे गुंतागुंतीची अनेक कामे गणिते नमव छपाई इत्यादी सर्व कामे करता येतात संगणकाच्या विविध गुणधर्मामुळे सध्या अनेक कार्यालयांना मध्ये तसेच मोठ्या कंपन्यांमध्ये संगणकाला मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

संगणकाने आपले वर्चस्व निर्माण केलेले नाही असे एकही क्षेत्र आता राहिले नाही संगणक म्हणजे एक कल्पवृक्ष आहे आपल्या इच्छेनुसार आपल्याला कोणतेही काम करून देतो.

निबंध – आरती दळवी

तुमचेही निबंध आमच्या WhatsApp नंबर वर पाठवू शकता निबंध टाईप केलेला किंवा वहीत लिहलेले व्यवस्थित फोटो काढून 8329865383 या नंबर वर  पाठवावा .

Leave A Reply

Your email address will not be published.