हिमालय पर्वत माहिती |
हिंदुकुश व हिमालय पर्वतांमुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर, बोलन या खिंडींमधून जाणारा खुश्कीचा व्यापारी मार्ग आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला होता. चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग ‘रेशीम मार्ग’ म्हणून ओळखला जातो. कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशांत पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम प्रमुख होते. याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले.