आपली कुवत पाहून वक्तव्य करावे : शहर अध्यक्ष मनिषा सोनमाळी


कर्जत जामखेड :
मतदारसंघात सध्या ‘आमदार आपल्या दारी’ हा अत्यंत लोकप्रिय असा उपक्रम राबविला जात असून त्याला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात आ. रोहित पवार यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करतात. त्याचा काही लोकांना त्रास होत असल्याने आ. रोहित पवार हे पोलीस बंदोबस्त घेऊन फिरतात, अशी चुकीची विधाने केली जात आहेत. वास्तविक पाहता रोहित दादा हे जनतेत राहून काम करणारे नेते आहेत. त्यांना पोलीस संरक्षणाची गरज नाही यापुर्वी च आमदारांना असलेले संरक्षण ही घेतलेले नाही. शासनाने दिलेले संरक्षण सुध्दा आ.रोहित दादा पवार यांनी 

नाकारलेले आहे.त्यामुळे त्यांना संरक्षणात फिरण्याची गरज नाही  . असे मत नगरसेविका मनिषा सोनमाळी यांनी

 एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे  व्यक्त केले. 

पुढे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, 

आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकासाचे वारे वाहू लागले आहे. त्यांच्या प्रयत्नातून कित्येक नवीन कामे मंजूर झाली असून अनेक कामे सुरू आहेत. ती दर्जेदार होत असल्याचे लोक सांगत आहेत. श्री संत सदगुरु गोदड महाराज यांची ग्रंथसंपदा जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य दादांनी सुरू केले आहे. मात्र त्यांनी केलेला विकास हा काहींना देखवत नाही. त्याचा काहींना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे विविध प्रकारची दिशाभूल करणारी विधाने केली जात आहेत. अशी विधाने करण्यापूर्वी त्यांनी आपले जनमत, वार्डातील स्थिती तपासून घ्यावी व आपली कुवत पाहून वक्तव्य करावे.

आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, दळणवळण, पर्यटन, सांस्कृतिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर भरीव काम उभारले जात आहे. नगर- सोलापूर महामार्गाच्या कामासाठी आ. रोहित पवार यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाले आहे. प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन हे काम सुरू आहे. आ. पवार यांच्या दूरदृष्टीतून मतदारसंघाचा वेगाने विकास होत आहे. यामध्ये कर्जत तालुक्यातील अधिकाऱ्यांचे काम उल्लेखनीय ठरत आहेत. त्याचा मतदारसंघात सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.असेही शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनिषा सोनमाळी (Manisha Sonmali of NCP) यांनी म्हटले आहे.

 

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment