Pune News येरवडा येथे समता शाळेसमोर मोठा अपघात , इथे पहा

Pune News येरवडा येथे समता शाळेसमोर मोठा अपघात , इथे पहा

पुणे, ०२ ऑगस्ट २०२५:
येरवड्यातील महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड समता शाळेसमोर एका ५२ वर्षीय पादचाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून, भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने धडक दिल्यानंतर चालक अपघातस्थळावरून पळून गेला आहे.(pune road accident latest news )


घडलेली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि. २४ जुलै २०२५) रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. येरवड्यातील महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड समता शाळेसमोर, सुमेद विष्णू मापारे (वय ५२, रा. स.नं. १९१ नागपूर चाळ, जुना जकात नाका, येरवडा, पुणे) हे पायी रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला.

फिर्यादी (वय ३७, रा. येरवडा, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुमेद मापारे हे रस्ता ओलांडत असताना, एका अज्ञात वाहन चालकाने त्याचे वाहन वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, अत्यंत हयगयीने, अविचाराने आणि भरधाव वेगात चालवले. या अज्ञात वाहनाने सुमेद मापारे यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात घडवल्यानंतर, अज्ञात वाहनचालक घटनास्थळी न थांबता थेट पळून गेला. त्याने जखमींना कोणतीही मदत केली नाही किंवा पोलिसांना माहिती दिली नाही.


पोलिसांची कारवाई

या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५२७/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १०५, १२५, २८१ आणि मोटर वाहन कायदा कलम ११९/१७७, १३४ (अ) (ब), १८४ नुसार अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बेदरकार वाहन चालवून निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post