Ahmednagar : कर्जत मध्ये शेतकऱ्यांचे तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन


ad

Ahmednagar : शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळालीच पाहिजे. तसेच जळालेल्या डीपी तात्काळ उपलब्ध करावी अन्यथा शेतकऱ्यांना कायदा हातात घेऊन आपले प्रश्न सोडवावे लागेल. मते मागताना सत्ताधारी वेगळे बोलतात. आता सत्तेत असताना त्याच वाक्यात घुमजाव करण्यात धन्यता मानतात. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे असे प्रतिपादन माजीमंत्री राम शिंदे (Former Minister Ram Shinde) यांनी केले. ते कर्जत येथे भाजपा आयोजित शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलन प्रसंगी बोलत होते. तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन चालले. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, किसान मोर्च्याचे सुनील यादव, शांतीलाल कोपनर, बापू शेळके, ज्ञानदेव लष्कर, सोयब काझी यांच्यासह राजकीय पदाधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

        यावेळी पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले की, मुहूर्त पाहून विद्यमानआमदार कुकडीचे पाणी सोडताना दिसत आहे. राजकीय पक्षाचे लोक पाहत चाऱ्यास पाणी सोडण्याचा फतवा निघत आहे. लोकांना वेठीस धरून कारखाने चालवले जाते. तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहात. मात्र अधिकारी घराणेशाहीचे कामगार असल्याचे वागत आहे. यावेळी राम शिंदे यांनी सर्व अधिकाऱ्यांशी समोरासमोर सवांद करीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासनास धारेवर धरले.  पठाणी वीजबील वसुली थांबवावी. पहिल्या वेळेस वर्षातून एकदा वसुली करीत असताना आता चार वेळा महावितरण वसुली करत आहे. हा अन्याय आहे. शेतकऱ्यांचा ऊस गेल्यावर ती निश्चित बील भरतील यासाठी त्यांना वेठीस धरू नका. वीज कनेक्शन कट करू नका. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रीतसर वीजबील भरून देखील फिडर बंद करीत त्यांना मनस्ताप देत असल्याचे अनेक उदाहरणे राम शिंदे यांनी महावितरण समोर आणली. गरीब आणि वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांवर महावितरण, कुकडी विभाग अन्याय करीत आहे ते बंद करा अन्यथा यापेक्षा उग्र भावना पुढे येतील. आरजेडीने माणसे उपलब्ध करीत उसतोडीचा प्रश्न मार्ग लावावा असे म्हणत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपा सोबत असल्याची ग्वाही उपस्थित शेतकऱ्यांना दिली. 

       यावेळी बोलताना सचिन पोटरे म्हणाले की, कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed)ची जनता भुलभुलैय्याला फसली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून विद्यमान लोकप्रतिनिधी चित्रे काढत बसली. प्रतिकृती उभारत त्यांचे पावित्र्य भंग करण्याचे काम करीत आहे. उन्हाळ्याचे आवर्तन पावसाळ्यात देण्याचे काम यांना छान जमले. सध्या फोटो काढून ते काम आपणच करत असल्याचा केविलवाणा प्रयत्न आ रोहित पवार करीत असल्याचे पोटरे यांनी नाव न घेता टोला लगावला. कुकडी सल्लागार समितीत कर्जतचा पदाधिकारी सोडून श्रीगोंदयाला स्थान दिले हा यांचा विकास आहे असे म्हणत आ पवारांवर टीकास्त्र सोडले. 

        यावेळी अल्लाउद्दीन काझी, अशोक खेडकर, सुनील यादव, संजय तोरडमल, काका धांडे, पप्पू धोदाड, तात्यासाहेब माने, गोपीनाथ जगताप, सुनील काळे, दत्ता शिपकुले, धनंजय मोरे, नगरसेविका आश्विनी दळवी, राणी गदादे, आशा वाघ यांच्यासह अनेकांनी आपल्या उग्र भावना व्यक्त केल्या. यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रवीण जमदाडे, साखर विभाग आणि कुकडीचे अधिकाऱ्यानी उपस्थित प्रश्नांना उत्तरे दिली. आंदोलनाच्या ठिकाणी पंढरपूर येथील तरुण शेतकरी सुरेश जाधव यांनी वीज प्रश्नांस कंटाळून आत्महत्या केली होती त्यास भाजपाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top