अहमदनगर : पै प्रवीणदादा घुले यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित करण्यात आलेला पैलवान चषक पोलीस इलेव्हन शिरूर हे मानकरी ठरले. (Police XI Shirur won the Wrestling Cup on the occasion of Pravindada Ghule’s birthday.) तर एस आर पी एफ दौड संघाने उपविजेता ठरला.
कर्जत येथे पै प्रवीणदादा घुले यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य पैलवान चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते नगरसेवक सचिन घुले व सहकार्याच्या उत्कृष्ट नियोजनाने पार पडलेल्या स्पर्धेत अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. या सामन्यात पोलीस इलेव्हन शिरूर संघाने प्रथम फलंदाजी करत सहा षटकात 96 धावा केल्या यामध्ये कुणाल खोंड याने अर्धशतक करत जोरदार फलंदाजी केली मोठे आवाहन घेऊन उतरलेल्या एस आर पी एफ दौड संघाला ही धावसंख्या सातत्याने पडलेल्या विकेटमुळे गाठता आली नाही व पोलीस इलेव्हन शिरूर संघाने पहिल्या पैलवान चषकावर आपले नाव कोरले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात कर्जत मधील माजी क्रिकेटपटूचा सत्कार करण्यात आला तर स्पर्धेतील फायनल मॅन ऑफ द मँचचा पुरस्कार कुणाल खोंड यास तर उत्कृष्ट फलंदाज स्वप्नील भालेराव, उत्कृष्ट गोलंदाज संतोष कुदळे, मॅन ऑफ द सिरीज कुणाल खोंड, यांना गौरविण्यात आले या स्पर्धेसाठी पंच म्हणून राणेसर, दीपक पिळगावकर, अक्षय चांदगुडे यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमात अनेकांनी पै प्रवीण घुले यांचा सत्कार केला यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाध्यक्ष किरण पाटील, भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, तात्यासाहेब ढेरे, राष्ट्रवादीचे प्रसाद ढोकरिकर, सचिन कुलथे, बापूसाहेब नेटके, भास्कर भैलूमे, काकासाहेब शेळके, आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रथम पारितोषिक हे ७७,७७७/- पै प्रवीण घुले मित्रमंडळा चे तालुकाअध्यक्ष महेश तनपुरे यांचे वतीने पोलीस इलेव्हन शिरूर यांनी पटकावले, द्वितीय पारितोषिक ५५,५५५/- आंबीजळगावचे सरपंच विलास निकत यांच्या वतीने एस आर पी एफ दौड या संघाने पटकावले, तृतीय पारितोषिक ४४,४४४/- युवा उद्योजक रणजित नलवडे यांच्या वतीने देसाई इलाई टेड पीसीएमसी पुणे यांनी पटकावले तर चतुर्थ पारितोषिक ३३,३३३/- श्री गोदडमहाराज अर्बन निधी ली. चे चेअरमन ओंकार तोटे यांच्या वतीने वाजीद इलेव्हन दौंड या संघाने पटकावले.
यावेळी देण्यात आलेले सन्मानचिन्ह डॉ नितीन तोरडमल, प्रसाद कानगुडे व संजयशेठ काकडे यांचे वतीने देण्यात आले, स्पर्धेत अमोल भगत, अमित तोरडमल, नितीन गदादे, अतुल धांडे, विशाल तोरडमल, शेरखान पठाण, विजय मोरे, पिंटू शेलार यांनी उत्तम संयोजन केले तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रीयेश सरोदे, शिवम कांबळे, राम जहागीरदार, रवी सुपेकर, राजू बागवान, अमोल तोरडमल, दीपक बोराटे, सुजित घोरपडे, विजय तोरडमल, उमेश गलांडे, गणेश लोखंडे, कार्तिक तोरडमल, कार्तिक शिंदे, आदित्य घुले, रिकी पाटील, प्रणित पाटील, अक्षय तोरडमल, माजीद पठाण, इम्रान पठाण, युनूस पठाण, हर्षदीप सोनवणे, स्वप्नील बोरकर, निखिल कोठारी, विकास पवार, भीमा थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेतील दोन अंतिम सामन्यात सिक्स मारणाऱ्या खेळाडूस प्रसाद ढोकरिकर यांच्या वतीने प्रत्येक सिक्स साठी एक हजार रु बक्षीस देण्यात आले, यासारखी अनेक बक्षिसे यावेळी जाहीर करण्यात आली. स्पर्धेसाठी अनिल भैलूमे यांनी लाऊडस्पीकर व मंडपचे तर बाळा आखाडे यांनी केटरिंग साहित्याचे सहकार्य केले. अरबाज आतार यांनी मोफत वायफाय दिले, बाबा बेग यांनी पाणी मोफत उपलब्ध करून दिले.