Behind the crimes of the Maratha movement : कर्जतमध्ये मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेतल्याने जल्लोष

The crimes of the Maratha movement were withdrawn: कर्जतमध्ये मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेतल्याने जल्लोष

कर्जत  / प्रतिनिधी : तालुक्यामध्ये दोन-तीन वर्षांपूर्वी मराठा समाजासाठी आरक्षणाच्या मुद्द्यांवर मोठे आंदोलन पेटले होते, त्यावेळी अनेक मराठा युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तालुक्यामध्ये आंदोलनात कथित वन खात्याची जीप जळीत प्रकरणासह आणखी चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सरकारने मराठा आरक्षण आंदोलनाचे सर्व गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली होती, परंतु प्रत्येक्षात प्रलंबीत गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण होत नव्हती. कर्जत मधील नितीन तोरडमल या आंदोलनात सहभागी असणाऱ्या युवकाने जोपर्यंत मराठा आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याची भुमिका घेतली होती. या सर्व प्रश्नांवर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सरकार दरबारी योग्य तो पाठपुरावा केला.त्यानंतर कर्जत न्यायालयातील मराठा आरक्षण आंदोलनाचे सर्व गुन्हे मागे घेतल्याने निकाली काढण्यात आले.

Karjat News in Marathi : निवडणुकीत लागणार

ad

 आजी-माजी आमदारांच्या सामर्थ्याची कसोटी

मराठा आंदोलकांवरील गुन्हे निकाली निघाल्यानंतर सर्व मराठा सेवकांनी कर्जतच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. त्यावेळी आंदोलनाच्या गुन्ह्यातून मुक्त झालेल्या मराठा युवकांचा फेटा बांधून सत्कार केला तसेच नितिन तोरडमल याला सकल मराठा समाजाच्या वतीने पायात चप्पल घालण्यात आली.

 यावेळी सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक दिपक काळे, बाळासाहेब साळुंखे, प्रविण घुले, विजय तोरडमल, सचिन घुले, ॲड. दिपक भोसले, नानासाहेब धांडे, ॲड. धनराज राणे, तानाजी पाटील, धनंजय लाढाणे, सुधीर यादव, महेश तनपुरे, ॲड. नितीन जगताप, विठ्ठल पिसाळ, काकासाहेब काकडे, भाऊसाहेब तोरडमल, अविनाश जाधव,  निलेश तनपुरे, नितीन तोरडमल पाटील, दत्ता भोसले, महेश शिंदे, अजित वडवकर,रामेश्वर तोरडमल, आप्पा काळे, विजय मोरे, प्रसाद कानगुडे, संतोष धुमाळ, शेखर पठाडे, राम जहागिरदार, अतुल धांडे, श्रीहरीजगताप, महेंद्र धांडे, पिंटू धांडे, बळीराम धांडे, स्वप्नील तोरडमल, रवि तोरडमल, सूरज तोरडमल, रमेश गांगर्डे, काका लांगोरे, महेश तोरडमल, सोमा यादव, रामदास सूर्यवंशी, सागर लाळगे, राजेंद्र लाळगे यांसह अनेक मराठा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *