Christmas 2021 : क्रिसमस माहिती मराठी जाणून घ्या ,ख्रिसमसचा इतिहास, येशूचा जन्म,ख्रिसमस ट्री बद्दल आणखी बरेच काही
क्रिसमस माहिती मराठी
नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो.ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ‘ख्रिसमस्टाईड’ नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात.
या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, नाताळ शुभेच्छापत्र देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ (ख्रिसमस ट्री – नाताळसाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते.
येशूचा जन्म कुठे झाला?
त्याचा जन्म जुदेआच्या बेथलेहेम या गावी एका गोठ्यात झाला. संत लूकच्या लेखनातून येशूची आई मारिया आणि वडील योसेफ यांच्या दृष्टिकोनातून बेथलेहेमच्या यात्रेचा वृत्तान्त दिलेला आहे.असे मानले जाते की, या दिवशी देवदूताने त्यांना मसिया म्हणून उद्देशिले व आजूबाजूचे सर्व मेंढपाळ त्यांची स्तुती करत होते. तसेच संत मॅॅथ्यू यांच्या सुवचनानुसार तीन राजे येशूंना भेटायला आले होते. त्याच लोकांनी येशूला भेटवस्तू दिल्या. येशूंच्या जन्माचा संदेश मिळताच त्यावेळच्या राजा हेरॉडने दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना ठार मारायचे आदेश दिले. त्यामुळे येशूंचे कुटुंबीय जीव वाचवण्यासाठी इजिप्तला गेले.अशी माहिती आहे .
ख्रिसमस ट्री ची माहिती [Christmas Tree Information]
नाताळ वृक्ष (ख्रिसमस ट्री) हे ख्रिस्ती धर्मातील नाताळ सणाचे वैशिष्ट्य मानले जाते. नाताळ सणाला हा वृक्ष सजवून आकर्षक केला जातो. फर, पाईन, किंवा सदाहरित वृक्ष कोनिफर हे नाताळ वृक्ष म्हणून सजविले जातात.
ख्रिश्चन धर्मात, ख्रिसमस ट्री येशू ख्रिस्ताच्या जन्माचे आणि पुनरुत्थानाचे प्रतीक आहे. झाडाच्या फांद्या आणि झुडुपे अमरत्वाचे प्रतीक म्हणून पाहिली जातात आणि ख्रिस्ताने वधस्तंभावर घातलेल्या काट्यांचा मुकुट असल्याचे म्हटले जाते.
Leave a comment