Dada Patil College Karjat : शिक्षक -पालक सहविचार सभा , मार्च २०२२ मध्ये होणाऱ्या बारावीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात नियोजन

ad

Dada Patil College Karjat  : येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात शिक्षक पालक सहविचार सभेचे आयोजन प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर मार्च २०२२ मध्ये होणाऱ्या बारावीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात नियोजन, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी शिक्षक व पालक यांच्यामध्ये संवाद  होऊन विद्यार्थ्यांची प्रगती समजावी या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  उपस्थित पालकांनी महाविद्यालयातील उपक्रमांचे कौतुक केले . 

 यावेळी प्राचार्य डॉ. नगरकर यांनी  ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवत्तेमध्ये कमी नाहीत. ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेमध्ये विद्यार्थी शिक्षण प्रवाहामध्ये टिकून ठेवणे व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. शिवाय सीईटी, नीट, जीईई मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी क्रॅश कोर्सचे आयोजन करणार असल्याचे सांगितले. ग्रंथपाल श्री.बबन कुंभार यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयातून पुस्तके उपलब्ध करून देण्याविषयी आश्वासन दिले. पालक श्री. राजेंद्र गोरे यांनी इयत्ता बारावीसाठी ऑफलाईन परीक्षा घ्याव्यात यासाठी पाठिंबा दर्शविला. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य श्री. पी.बी.काळे यांनी केले. सायन्स विभागाचे उपप्राचार्य श्री.खंडागळे एम. आर. यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली.  सूत्रसंचालन सौ. मीना खेतमाळीस व श्री किरण भांडवलकर यांनी केले. तर आभार  प्रा. राजेश दळवी यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व पालक उपस्थित होते.सोशल डिस्टन्सिंग पाळून या सभेचे आयोजन करण्यात आले .

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top