Gadge Maharaj Punyatithi: संत गाडगे बाबा यांच्या बद्दल माहित नसणाऱ्या गोष्टी

Post by

 गाडगे बाबा (gadge baba) हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. २० डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी आहे .या निमित्ताने आपण संत गाडगे बाबा यांच्या बद्दल माहित नसणाऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत .


 • गाडगे महाराज हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते.
 • महाराजांना लहानपणापासूनच  शेतीत रस होता, गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे. त्यांचे वडील झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते.
 • डेबूजी (गाडगेबाबा) लहान असतांनाच त्यांचे वडील दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले.
 • गाडगे महाराजांचे लग्न १८९२ साली  झाले.
 • On February 1, 1905, he resigned from his household and accepted sannyas.
 • दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला.
 • सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.
 • ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत.
 • कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
 • नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली त्या आजही सुरु आहेत .
 • अमरावतीजवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले
 • “मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही” असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले
 • १९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली.
 • गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
 • डॉ बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबांना  गुरुस्थानी मानत असत.
 • गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते.
 • डेबू : हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे

गाडगे महाराजांचा विवाह कधी झाला

गाडगे महाराजांचे लग्न १८९२ साली झाले .

Leave a comment