Latest Marathi News Headlines: मराठी बातम्या - लेटेस्टली covers Latest News, ताज्या बातम्या and Breaking events across the globe, providing information in Marathi on the topics including Sport, क्रीडा, Entertainment,Maharashtra, महाराष्ट्र, India, भारत and World News, Lifestyle, Technology, Automobile, Social and Human values.

gallantryawards : शौर्यपदकांच्या आभासी संग्रहालयाचे पोर्टल लॉन्च ,शूरवीरांच्या पराक्रम आणि त्यागाच्या गाथा सादर

gallantryawards : शौर्यपदकांच्या आभासी संग्रहालयाचे पोर्टल लॉन्च ,शूरवीरांच्या पराक्रम आणि त्यागाच्या गाथा सादर

 gallantryawards : संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्या हस्ते दि.20 जानेवारी 2022 या दिवशीशौर्यपदकांच्या पोर्टलवरील (https://www.gallantryawards.gov.in/ वरील) आभासी संग्रहालयाचे उद्‌घाटन झाले. शौर्यपदकांनी सन्मानित वीरांच्या पराक्रमत्याग आणि वचनबद्धतेच्या गाथा या संग्रहालयात अभिनव पद्धतीने आणि पाहणाऱ्यास सोयीस्कर रीतीने सादर केल्या आहेत. संग्रहालयात फेरफटका मारण्याचा त्रिमितीय अनुभवदीर्घिकेची वास्तूलॉबीवॉल ऑफ फेमयुद्धस्मारकांचा दौरायुद्धकक्षसंसाधन केंद्रसेल्फी कट्टासामग्री प्रदर्शन आदींचा यामध्ये समावेश असेल. संरक्षण मंत्रालयभारतीय संरक्षण सामग्री उत्पादकांची एसआयडीएम ही संस्थाइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि भास्कराचार्य राष्ट्रीय अवकाश उपयोजन आणि भू-माहितीशास्त्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे आभासी संग्रहालय विकसित करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त याची निर्मिती करण्यात आली आहे.

Kylie Jenner: इंस्टाग्रामवर 300 दशलक्ष फॉलोअर्स मिळवणारी पहिली महिला ,काइली जेनर ,जाणून घ्या

 “देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांच्या योगदानाचा यथोचित सन्मान या आभासी संग्रहालयाच्या माध्यमातून होऊ शकेल. त्यांच्या शौर्याच्या गाथा सर्वसामान्य जनतेपर्यंत- विशेषतः तरुणांपर्यंत पोहोचतील.” असे सांगून, ‘या आभासी संग्रहालयामुळे अधिकाधिक लोकांना शौर्य पुरस्कारांच्या संकेतस्थळाला भेट देण्यास प्रोत्साहन मिळेल तसेच युवावर्गाला सैन्यदलात सामील होण्यास प्रेरणा मिळेल‘, असा विश्वासही भट्ट यांनी यावेळी व्यक्त केला.

Sant Nivruttinath Maharaj: या ठिकाणी जाऊन निवृत्तिनाथ महाराजांनी श्री ज्ञानेश्वर महाराजांना गीतेचा अर्थ मराठीत सांगण्याची आज्ञा केली !


लॉगिन कसे करायचे ?

भेट देणाऱ्यांना म्हणजे व्हिजिटर्सना लॉग इन करून आपली नोंदणी करता येईल. एखाद्या ठराविक शौर्य पुरस्काराने सन्मानित झालेल्या सर्व शूरांची माहिती एकत्र पाहता येईल आणि कस्टमाइज्ड म्हणजे व्यक्तिविशिष्ट पद्धतीने त्यांना श्रद्धांजलीही वाहता येईल. या आभासी संग्रहालयात समाविष्ट केलेल्या युद्धकक्षामध्ये या शौर्य पुरस्काराने गौरवित शूरांच्या पराक्रमाच्या कथाही पाहता येतील. तसेच स्फूर्तिदायी ध्वनिचित्रफितींचा संग्रह आणि सामग्री प्रदर्शनही यामध्ये अंतर्भूत आहे. संकेतस्थळावरील वैविध्यपूर्ण संग्रहातून आपल्या आवडीनुसार एखादी पार्श्वभूमी निवडून त्यासमोर सेल्फी काढण्याची संधीही या आभासी संग्रहालयातील सेल्फी कट्ट्यामुळे मिळू शकणार आहे.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel
Leave A Reply

Your email address will not be published.