इंडिया पोस्टच्या माध्यमातून आपण आपले लेटर्स कागदपत्रे तसेच इतर पार्सल्स India Post च्या माध्यमातून पाठवत असतो . आपण हे पार्सल Speed post किंवा Registered Post करून पाठवतो यावेळी आपल्याला विशिष्ट्य सेवा दिल्या जातात . आपण आपले स्पीड पोस्ट कसे ट्रॅक करतात ? याची माहिती पाहुयात .
भारतीय पोस्टमध्ये consignment number काय आहे ?
Consignment क्रमांक युनिक असतो आणि प्रत्येक पार्सलला दिला जातो. कन्साइनमेंट नंबरद्वारे तुम्ही मालाची स्थिती किंवा स्थान ऑनलाइन ट्रॅक करू शकता. काही सेकंदात पार्सलची स्थिती ट्रॅक करणे सोपे आहे.
स्पीड पोस्ट कसे ट्रॅक करतात ?
अँप च्या माध्यमातून : त्यासाठी प्ले स्टोअर वरून भारतीय डाक (पोस्टातर्फे) असलेलं POST IMFO अप्लिकेशन डाउनलोड करून घ्या.
त्यातील TRACKING निवडून त्यात बुक केलेल्या स्पीड पोस्ट चा रेजिस्ट्रेशन नंबर टाकावा..(रेजिस्ट्रेशन नंबर हा EA, EM इत्यादी अक्षरांपासून सुरू होऊन शेवटी ‘IN’ ने संपत असतो)
वेबसाइट वरुन : TRACKING निवडून त्यात बुक केलेल्या स्पीड पोस्ट चा रेजिस्ट्रेशन नंबर टाकावा..(रेजिस्ट्रेशन नंबर हा EA, EM इत्यादी अक्षरांपासून सुरू होऊन शेवटी ‘IN’ ने संपत असतो) हे आपण वेबसाइट वर देखील करू शकता .