Karjat:अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ फरार आरोपीच्या पुन्हा आवळल्या मुसक्या

0

         एका अल्पवयीन मुलीला तालुक्यातील गलांडवाडी येथील प्रकाश चंद्रकांत वगरे याने आमिष दाखवून व फुस लावुन पळवून नेल्याची घटना घडली होती.याबाबत निर्भयाच्या भावाने (बदललेले नाव) कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपीवर भादवी कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास तपासी अंमलदार पोलिस नाईक अंधारे हे करत होते.त्यानंतर आरोपी हा अपहृरीत मुलीसह कुळधरण येथे येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली.पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले असता आरोपीच्या दबावामुळे अपहृरीत मुलीने आपल्यावर कोणताही अत्याचार झाला नसल्याचे सांगितले होते.त्यांनतर अल्पवयीन असलेल्या निर्भयास अहमदनगरच्या बालकल्याण समिती यांच्यासमोर हजर करण्यात आले असता तिने पालकांकडे जाण्यास नकार दिला.आरोपीला अटक करून कर्जतच्या न्यायालयासमोर हजर केले असता त्याची जामीनावर मुक्तता करण्यात आली.पिडितेने दि.२९ डिसेंबर २०२१ रोजी पुन्हा पोलिसांसमोर जबाब दिला की,’आरोपीने मला पळवून नेऊन दौंड येथील खोली भाड्याने घेऊन तिच्यावर दोन ते तीन वेळा इच्छा नसताना बलात्कार केला आहे.पीडितेच्या या जबाबाने नमूद गुन्ह्यात भादवी कलम ३७६(२)(आय)(जे)(एन),३७६(३) बा.लै.अ.सं कायदा (पोस्को) २०१२ कलम ३,४,५ (एल) व ६ प्रमाणे वाढीव कलम लागल्याने सदरचा तपास हा स.पो.नि.सतिष गावीत यांच्याकडे वर्ग करण्यात आला.आरोपीचा न्यायालयात जामीन झाल्याने त्यास पुन्हा अटक करुन त्याची कोठडी घेण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर उभे होते. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि./ सतिष गावीत व त्यांचे रायटर पो.कॉ.संतोष फुंदे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कर्जत यांच्या न्यायालयात रिपोर्ट देवुन आरोपीचा जामीन रद्द करुन घेतला व संबंधित गुन्हा हा ‘पोक्सो’ कलमांतर्गत असल्याने तातडीने श्रीगोंद्याच्या विशेष न्यायदंडाधिकारी जिल्हा व सत्र न्यायालयाची आरोपीस तपासकामी पुन्हा ताब्यात घेण्याची परवानगी मिळवली.मात्र आता आरोपी हा फरार झाला होता त्यामुळे पोलीसांपुढे आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्याचे आव्हान होते. पोलिसांनी सतर्क होत आरोपीचा कसून शोध सुरू केला.आरोपी हा त्याचे वास्तव्याचे ठिकाण वेळोवेळी बदलत होता. त्यानंतर आरोपी हा श्रीगोंदा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सतिष गावीत, पो.कॉ.संतोष फुंदे,चा.पो.कॉ.बेग यांनी श्रीगोंदा येथे जावुन आरोपीस शिताफीने आपल्या ताब्यात घेऊन त्यास अटक केली. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

ad

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,

अपर पोलिस अधिक्षक, सौरभ अग्रवाल,

उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित, पोलीस अंमलदार प्रवीण अंधारे, शाम जाधव, संतोष फुंदे यांनी केली.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel
Leave A Reply

Your email address will not be published.