कर्जत ( प्रतिनिधी ) येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयातील बारावी विज्ञान या वर्गातील कु.शर्वरी त्र्यंबक खराडे हिने गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय शिकई स्पर्धेत ब्रॉंझ पदक पटकावले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय नगरकर यांनी दिली .याशिवाय .राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत तिने अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत.
कु.शर्वरी हिच्या यशा बद्दल प्राचार्य डॉ संजय नगरकर यांनी सत्कार करून कौतुक केले. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आ. रोहित पवार, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. राजेंद्रजी निंबाळकर व बप्पासाहेब धांडे, प्राचार्य डॉ.संजय नगरकर उपप्राचार्य प्रा. भास्कर मोरे, डॉ पाटील महिंद्र, यांनी शर्वरी खराडे हिचे अभिनंदन केले. आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ आणि प्रा.शिवाजी धांडे, पांढारकर सर यांचे तिला मार्गदर्शन लाभले. शर्वरी चे सर्वत्र कौतुक होत आहे.