Karjat : इथे साजरा करण्यात आला सहाशे झाडांचा वाढदिवस

 

मागील वर्षी लावलेल्या सहाशे झाडांचा वाढदिवस झाडांना फेटा बांधून व सहाशे किलोचा खताचा केक कापून साजरा करण्यात आला, यावेळी नववर्षाचे स्वागत शंभर झाडे लावून करण्यात आले.

कर्जत येथे सर्व सामाजिक संघटना व नगर पंचायत कर्जत यांच्यावतीने माझी वसुंधरा अंतर्गत 

           कर्जत येथे २ ऑक्टो २०२० पासून शहरातील सर्व सामाजिक संघटनानी एकत्र येऊन दररोज सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत श्रमदान करण्याचे सातत्य ठेवले असून आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी सलग पणे ४५७ वा दिवस होता, या काळात शहरात लावलेल्या बावीस तेवीस हजार झाडांचे नगर पंचायत कर्जतच्या सहकार्याने जोपासना करण्याचे काम करण्यात आले आहे.  मागील वर्षी १ जाने २०२१ रोजी नववर्षानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सहाशे झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले होते, गेली एक वर्षात अनेकदा या ठिकाणी सर्व श्रमप्रेमीनी सातत्याने श्रमदान करून या झाडांची निगा राखलेली आहे, या सहाशे झाडाचा पहिला वाढदिवस आज साजरा करन्यात आला.  नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी माझी वसुंधरा २ अंतर्गत  महाश्रमदानाचे आयोजन करत १ जाने २०२२ रोजी सकाळी ७-०० वा कर्जत राशीन रस्त्याच्या कडेला शंभर झाडांची लागवड करण्यात आली.

ad

 यावेळी सहाशे किलो गांडूळ खत, शेण खतांचा वापर करून बनवलेला भव्य केक कापून तो झाडांना खाऊ घालण्यात आला. यावेळी सर्व सामाजिक संघटनांचे श्रमप्रेमी, महिला लहान मुलां बरोबरच दादा पाटील महाविद्यालयाचे एनसीसीचे छात्रसैनिक एनएसएसचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. यावेळी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, मुख्याधिकारी गोविंद जाधव, प्रवीण घुले, माजी वन अधिकारी अनिल तोरडमल यांनी मनोगते व्यक्त केली,  माजीमंत्री प्रा राम शिंदे यांनी याठिकाणी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. 

कर्जत शहराला स्वच्छ सुंदर व हरित करण्याच्या उद्देशाने झपाटलेल्या श्रमप्रेमीनी कोणाचेही नाव न वापरता व राजकारणाला दूर ठेवत सुरू ठेवलेल्या श्रमदानाचे सर्वच थरातून कौतुक होत आहे.

         येत्या नववर्षा पासून शहरातील नागरिकांनी व महिलांनी कर्जत शहराला स्वच्छ, सुंदर व हरित बनवण्यासाठी यात सहभाग घेवून सहकार्य करावे असे अवाहन सर्व सामजिक संघटनेच्या वतीने व्यक्त केले.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top