महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र:मराअ2020/प्र.क्र.20/म.प्र.-महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व परदर्शक करणे यासाठी महाराजस्व अभियानांतर्गत फेरफार अदालतीची आयोजन दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी (चौथ्या शुक्रवारी शासकीय सुट्टी असल्यास त्याच्या आदल्प
या दिवशी म्हणजे गुरवारी) महसूल मंडळ मुख्यालयी सकाळी ठिक 11.00 वाजता होणार आहे. तरी सर्व नागरीकांनी ज्यांचे फेरफार एक महिन्याच्या वर प्रलंबित आहेत त्यांनी उपलब्ध कागदोपत्री पुराव्यासह उपस्थित राहून नोंदी प्रमाणित करुन घ्याव्यात.
ऑक्टोबर महिण्याच्या चौथ्या शुक्रवारी घेण्यात आलेल्या फेरफार अदालती मध्ये 893 फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या, त्या मंडळनिहाय पुढील प्रमाणे, मिरजगांव 249, कर्जत-198, कोंभळी-128, राशिन-135, माही-110, भांबोरा-72 या प्रमाणे नोंदी निर्गत करण्यात आल्या तरी उदया दिनांक 26/11/2021 रोजी सकाळी 11.00 वा. तालुक्यातील सर्व महसूल मंडळाचे मुख्यालयी (कर्जत, मिरजगांव, राशिन, भांबोरा, माही, कोंभळी) आज अखेर प्रलंबित असणारे 341 फेरफार नोंदी निर्गत करणेकामी सर्व संबंधीत खातेदारांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन मा.श्री.अजित थोरबोले, उपविभागीय अधिकारी कर्जत भाग कर्जत व मा.श्री.नानासाहेब आगळे, तहसिलदार कर्जत यांनी केले आहे.