कर्जत / प्रतिनिधी : मोठ्या प्रमाणात विकासकामे केली मात्र त्यात राजकारण आणलं नाही.तुम्ही गेल्या दोन वर्षात काय कामे केली ते सांगा?पदाधिकारी कार्यकर्ते आजपासून तयारीला लागा. केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा.कुठल्याही आमिषाला भूलथापांना बळी न पडता भाजप मित्रपक्षांच्या सर्व उमेदवाराना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन भाजप चे प्रदेश उपाध्यक्ष माजीमंत्री राम शिंदे यांनी केले आहे.
येथील निवडणुकीत दडपशाही होत आहे याचे निषेधार्थ काल पासून माजीमंत्री राम शिंदे यांनी संत गोदड महाराज मंदिराच्या पायरीवर मौन व्रत आंदोलन केले.आज दुपारी या प्रकारचा निषेध करीत भाजप च्या वतीने श्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख मार्गावरून मूक मोर्चा काढण्यात आला.या बाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.सदर मोर्चा अक्काबाई नगर येथे आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले यावेळी ते बोलत होते.प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,जिल्हा बँक संचालक अंबादास पिसाळ,सह निरीक्षक बाळासाहेब महाडिक,जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे,तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे,दादासाहेब सोनमाळी,रवी सुरवसे,अजय काशीद,सोमनाथ पाचारणे,काका धांडे,गणेश क्षीरसागर यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते.
ते म्हणाले ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे त्यामुळे प्रत्येक मतदाराचा आशीर्वाद घेत त्यांना इमानदारीला मतदान करायला सांगा.त्यांची रोज उठून दमबाजी सुरू आहे मात्र लोकांच्या लक्षात आले आहे. आम्ही आमच्या कार्यकाळात भरपूर विकास केला,बंधारे बांधले मात्र यांनी बंधारे फोडले.त्यामुळे पावसाळा सरला की पाणीटंचाई सुरू झाली.प्रत्येक प्रभागात एक प्रभारी आणि एक सहायक नेमला आहे त्यांनी उमेदवारांसमवेत जात गेल्या पाच वर्षातली भाजपने केलेली कामे समजावून सांगा.त्यांना पराभव दिसू लागला आहे मात्र आपला विजय निश्चित आहे.
सुनील कर्जतकर म्हणाले विद्यमान लोकप्रतिनिधी च्या दबावाला आणि दडपशाही ला बळी पडू नका.येथे भाजप प्रदेश आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे घाबरूनका हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निरोप घेऊन मी येथे आलो आहे.
येथे आपला विजय निश्चित आहे.
अंबादास पिसाळ म्हणाले येथे
आमदार रोहित पवार दडपशाही करून दबाव आणून उमेदवारांना माघारी घेण्यास सांगितले..माजी मंत्री राम शिंदे हे मंत्री असताना व सत्तेत असताना देखील लोकशाही मार्गाने गेल्यावेळी निवडणूक लढविली आम्ही त्यांच्या विरोधात लढलो मात्र त्यांनी कधीही दडपशाही वा दबाव आणला नाही.येथे बिहार झाले की काय?
दादा सोनमाळी म्हणाले येथे लोकशाहीचा खून झाला आहे,की काय अशी परिस्थिती आहे.प्रशासन अधिकारी त्यांच्या धाकात आणि दडपणाखाली आहेत,त्या मुळे माजी मंत्री राम शिंदे व आम्ही सर्व जनतेच्या दरबारात व संत गोदड महाराजाकडे न्याय मागत आहोत.अरुण मुंडे,बाळासाहेब महाडिक,दिलीप भलसिंग,अजय काशीद,डॉ सुनील गावडे यांची भाषणे झाली.प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिन पोटरे यांनी केले तर आभार अनिल गदादे यांनी मानले.