Karjat Nagar Panchayat:कर्जत नगरपंचायत च्या नगराध्यक्षा पदी उषा अक्षय राऊत यांची बिनविरोध निवड

 

Karjat Nagar Panchayat:कर्जत नगरपंचायत च्या नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार असून ९फेब्रुवारी रोजी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उषा अक्षय राऊत यांचा 

 एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. आता अध्यक्षपदाची घोषणा दिनांक १६ रोजी विशेष सभा घेऊन करण्यात येणार आहे.  कर्जत नगरपंचायतचा नगराध्यक्ष निवडीसाठी ९ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत दिली होती. या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक उषा अक्षय राऊत यांचा एकमेव अर्ज आला. हा नामनिर्देशन अर्ज

नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्याकडे दाखल करण्यात आला. हा नामनिर्देशन अर्ज दाखल करतेवेळी माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, प्रतिभा भैलुमे, शहर अध्यक्ष सुनील शेलार, विशाल मेहत्रे, प्रसाद ढोकरीकर, सचिन घुले, दिपक शिंदे, सचिन कुलथे, देवा खरात, 

गटनेते संतोष मेहत्रे, उपगटनेते सतिष पाटील, नगरसेवक अमृत काळदाते, 

भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, 

नगरसेविका ज्योती शेळके, रोहिणी घुले, ताराबाई कुलथे, मोनाली तोटे, लंका खरात, सुवर्णा सुपेकर, छाया शेलार, आदि उपस्थित होते. 

उषा अक्षय राऊत

 यांचा अर्ज छाननीत वैध ठरल्याने अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे. कर्जत नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 

१७ पैकी १२ जागा जिंकल्या आहेत काँग्रेस पक्षाने   ४  तर  भाजपा २   ने जिंकली आहे नगराध्यक्ष निवडीसाठी १६ फेब्रुवारी रोजी विशेष सभा होणार आहे. त्यात नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्षाची देखील निवड होईल अशी माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली आहे.

रोहित दादा पवार यांची रणनिती यशस्वी

कर्जत नगरपंचायत च्या निवडणुकीत आमदार रोहित दादा पवार यांची निवडणूक रणनिती यशस्वी ठरली त्यामुळेच रोहित दादा पवार यांनी एकहाती सत्ता खेचून आणली. 

कर्जत नगरपंचायत च्या निवडणुकीत आमदार रोहित दादा पवार यांनी भाजपाच्या ताब्यातील नगरपंचायत वर निर्विवाद बहुमत मिळवले. रोहित दादा पवार यांनी नगरपंचायत च्या निवडणुकीत स्वतः जातीने लक्ष घालून कर्जत नगरपंचायत एकहाती सत्ता घेत 

भाजप चे राम शिंदे यांचा दारूण पराभव केला. रोहित दादा पवार यांच्या निवडणूक लढविण्याच्या कौशल्य पुढे राम शदे यांचा टिकाव लागला नाही.. 

राऊत घुले ठरले किंगमेकर

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा राऊत घुले ठरले किंगमेकर . कर्जत नगरपंचायत निवडणुकीत प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत व   जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष   प्रविण घुले यांच्या

 रणनितीत पुढे   टिकाव धरू शकेल असा मोहरा भाजपाकडे नव्हता व भाजपाची सर्व मदार ही भावनेवर व चिल्लर कार्यकर्ते यांच्या जीवावर होती. आमदार रोहित दादा पवार यानांचा फक्त टारगेट करून निवडणूक  जिंकू असा कयास माजी मंत्री राम शिंदे व चिल्लर कार्यकर्ते यांनी धरला होता पण तो अंदाज चुकल्याने राम शिंदे व चिल्लर कार्यकर्ते यांचा पराभव झाला आहे.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment