Kukudi’s Executive Engineer and Clerk: कुकुडीचे कार्यकारी अभियंता व लिपीका यांच्या कडून शेतक-याची अडवणूक रोहित दादा पवार यांच्या कडे तक्रार दाखल

 Kukudi’s Executive Engineer and Clerk:कर्जत तालुक्यातील कोळवडी येथील कुकुडीचे कार्यकारी अभियंता यांच्या कडून शेतक-याची अडवणूक होत असल्याची  आमदार रोहित दादा पवार यांच्या कडे तक्रार  

याबाबत अधिक माहिती अशी की बेनवडी येथे

कांतीलाल सिताराम मिसे  याची  गट नंबर ९ ४ मध्ये शेतजमीन आहे . सदर गट नंबर ९ ४ पैकी ०.०१ हे.आर. कुकडीकलव्यासठी संपादित झालेले आहे . सदर संपादित क्षेत्राची   खरेदीदेखील दिलेली आहे . यामुळे सदर संपादित क्षेत्राचा मोबदला  मिळणे आवश्यक आहे . कार्यालयकडे अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर लिपीक सुहास भाकरे यांनी संपादित क्षेत्राच्या मोबदला पोटी आपल्याकडील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कर्जत या बँकेचा चेक नंबर २१३८० ९ हा चेक ३,२६ , ९३७ अक्षरी तीन लाख सहवीस हजार नऊशे सदतीस रुपये इतक्या रक्कमेचा दि . ३०१०२०२१ चा चेक दिला . 

msamb.com : आजचे शेतमाल बाजारभाव, कुठे पहायचे शासनाची नवीन वेबसाइट

सदरचा चेक  मिळाल्यानंतर लागोलग दोन दिवसात  दि . १७११२०२१ रोजी भारतीय स्टेट बैंक शाखा कर्जत या बँकेत भरला परंतु सदर चेकवर असलेल्या दिनांक ३०/१० २०२१ महिना अंक २ हे अनेकवेळा गिरवलेले असल्याने  हा चेक बँकेने परत केला यामुळे सदर खाटाखोटीचा चेक कार्यकारी अभियंता कुकडी विभाग कोळवडी येथील  लिपिक  सुहास भाकरे यांच्याकडे  कोणत्याही लिखापडी विना परत केला आहे . व  भाकरे यांनी मला सांगितले की , चार दिवसात तुम्हाला दुसरा चेक मिळेल तुम्ही पैसे काढून घ्या  यानंतर एका महिन्यांनी पुन्हा

भाकरे  यांची भेट घेतली त्यांनी सांगितले काही दिवस थांबा त्यानंतर पुन्हा आठ दिवसांनी चेक बदलून मागितले असता चेक बदलून देत नाहीत.

 bhogi 2022: भोगी म्हणजे काय ? जाणून घ्या ,का व कसा साजरा करतात भोगी सण !

तरी भाकरे हे विनाकारण त्रास देऊन हेलपाटे मारावयास लावतात या बाबतीत कार्यकारी अभियंता यांना भेटलो असता तेही उदया या मग बघू असे उत्तर देवून बोलवण करतात. 

या त्रासाला कंटाळून भिसे यांनी आमदार रोहित दादा पवार यांच्या कडे लेखी तक्रार केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.