Letter Writing : साने गुरुजी यांना पत्र लेखन


 Letter Writing: पूर्वीच्या काळी पत्र हे संदेशवहन करण्याचे प्रमुख साधन होते. संपर्काची अन्य साधने उपलब्ध नसल्याने पत्र लिहून आपला संदेश समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचवला जायचा. पत्राचे दोन प्रकार पडतात. औपचारिक आणि अनौपचारिक. आता नव्या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटद्वारे ईमेलचा वापर करून जगात कोठेही लगेचच पत्र पाठविता येते. 

विषय :आपल्या आवडत्या साहित्यिकांना पत्र.

प्रिय साने गुरुजी, साष्टांग नमस्कार !

मराठी भाषेतील कोहिनुर अशी तुमची ओळख आहे. गुरुजी मी तुमच श्याम ची आई हे पुस्तक वाचल आणि आई या शब्दाचा खरा अर्थ मला कळाला.

“श्याम पायांना धान लागू नये म्हणून एवढा जपतोस तसच मनाला घाण लागू नये म्हणून जय हो गुरुजी  तुम्ही तुमच्या आईच्या तोंडचे हे शब्द आयुष्यभर जपले. तुमच्यावर आईच्या संस्काराचा झालेल्या प्रभावामुळे तुम्ही ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहले  व आज त्या पुस्तकामुळे पिढ्यान पिढ्या हे संस्कार इतर मुलांवर झालेले दिसतात. आई हे पुस्तक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच एक आदर्श आहे.

 तुमच्या घरची परिस्थिती हालाकीची असताना देखील तुमच्यात असणाऱ्या जिद्द व चिकाटी मुळे तुम्ही शिकून गुरूजी झालात. आजकालच्या मुलांसाठी तुमचा जीवनपाट म्हणजे एक मूर्तीमंत उदाहरण आहे.

गुरुजी पुस्तक वाचल्यामुळे मला असे समजले की, १९३० साली तुम्ही कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी झालात. या सहभागामुळे तुम्हांला तुरुंगवास भोगावा लागला. परंतु तिथे ही तुम्ही शांत नाही बसलात. नाशिकला कारागृहात तुम्ही त्यामची आई हे पुस्तक लिहिये. गुरुजी तुमचे हे पुस्तक बाल मनावर चांगल्या संस्कारांची बीज पेरण्याचे काम करते आहे. तुमच्या या पुस्तकातून तुमच तुमच्या आईवर किती प्रेम होतं हे जाणवतं.

तुमचं हे पुस्तक मला अत्यंत आवडलं कितीही वेळा वाच तरी वाचतच रहावसं वाटत. आईच्या संस्कारांची शिदोरी म्हणजे श्यामची आई हे पुस्तक आहे.

गुरुजी हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला भेटण्याची प्रत्येकाता इच्छा होते. परंतु गुरुजी तुम्ही जरी आज आमच्या सोबत नसलात तरी श्यामची आई या पुस्तकाच्या रूपाने तुमच पिखाठा व (यशोदाबाई) तुमच्या आईचे त्या थोर माऊलींचे विचार सदैव आमच्या सोबत आहे.. तुमचे आई वरचे प्रेम पाहून व श्यामची आई हे पुस्तक वाचून माझ्यात खूप चांगले परिवर्तन घडले आहे. म्हणून तुम्ही माझे आवडते साहित्यिक आहात. शेवटी  तुमच्या पुस्तकाबद्दल मी एवढच सांगल धन्य तो श्याम (गुरुजी) धन्य ती श्यामची आई !

तुमची वाचक, कु. वैभवी कपिल दळवी

साने गुरुजी यांना पत्र लेखन

साने गुरुजी यांना पत्र लेखन

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top