महामानवाचा ‘महापरिनिर्वाण’ दिन: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनी कोटी कोटी नमन

महामानवाचा ‘महापरिनिर्वाण’ दिन: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनी कोटी कोटी नमन

भारताचे शिल्पकार, महामानव, दलित मूळनिवासींचे नेते, बौद्ध धर्माचे प्रचारक, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणजेच महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले. त्यांचे निधन हा भारतीय समाजासाठी मोठा धक्का होता. मात्र, बाबासाहेबांनी आपल्या कार्यातून भारतीय समाजात एक क्रांती घडवून आणली.

बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने कित्येक दिशाहीन लोकांना योग्य मार्ग दाखवला. बदल हा गरजेचं असतो आणि तो घडवायचा असेल तर सुरुवात स्वतःपासून करा असा संदेश त्यांनी दिला. शिक्षण हा सर्वांचा मूलभूत हक्क आहे, त्याला कुठल्याही जातीचे बंधन नाही. त्यामुळे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशी प्रेरणा त्यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्र या विषयात कोलंबिया विद्यापीठातून पीएच.डी. पदव्या मिळवल्या. आंबेडकर यांचा सामाजिक कार्यांत मोलाचे योगदान आहे. दलितांविरुद्ध होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला. स्वातंत्र्याच्या सावलीत असूनही जातीपातीच्या उन्हात चटके खाणाऱ्या दलितांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक भव्य वृक्ष बनले. म्हणूनच त्यांना दलितांचा कैवारी म्हंटले जाते.

बाबासाहेबांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून आपले स्थान निर्माण केले. संविधानात त्यांनी दलितांना समान हक्क मिळवून दिले. त्यांनी दलितांसाठी आरक्षणाची तरतूद केली. बाबासाहेबांच्या या कार्यामुळे दलितांना समाजात सन्मानाचे स्थान मिळाले.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन आहे. या दिवशी आपण त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करूया आणि त्यांच्या विचारांचे अनुसरण करूया.

कविता:

भीमा तुझ्या शिक्षणाच्या तलवारीची धाराच न्यारी, भेदूनि टाकिली अहंकाराची डोकी सारी. तुझ्या शाहीत सामावले सारे आकाश, मनोमनी गिरवला तू विद्येचा ध्यास.

तू सूर्य तू पेटती प्रचंड ज्वाला, तुझ्या ज्ञानाच्या प्रकाशाने मिळे दिनदुबळ्यांना उजाळा.

रात्रंदिवस दिव्याच्या प्रकाशात जेव्हा कष्ट करी, तेव्हा बत्तीस पदव्यांचा तूच मानकरी.

बौद्ध चळवळीची तूच प्रेरणा, तुझ्यात सामर्थ्य भेदभाव नष्ट करण्याचं. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं, अन हक्कानं हक्क मागण्याच.

लाज नसावी दारिद्र्याची, लाज असावी दुर्गुणांची, वेळोवेळी तुझ्या लेकरांना हीच असे शिकवण तुझी.

संविधानाचा तूच पाया, तूच भारताचा शिल्पकार. दाही दिशांत घुमत राहो तुझाच जयजयकार तुझाच जयजयकार …

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या कार्यातून भारतीय समाजात एक क्रांती घडवून आणली. आजही त्यांचे विचार आपल्यासाठी मार्गदर्शक आहेत.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top