Maharashtra Police Establishment Day : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस , का व कधी साजरा केला जातो , जाणून घ्या
Maharashtra Police Establishment Day: महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना २ जानेवारी १९६१ रोजी करण्यात आली होती .भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला, आजच्या ऐतिहासिक दिनानिमित्त पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात १३ पोलीस आयुक्तालये व ३६ जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे १,८०,००० आहे. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे. … पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीसांचे प्रमुख असून राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे.
पोलीस हा राज्सरकारचा कर्मचारी असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी त्यास सोपविलेली आहे. आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही त्यास अधिकार आहेत.पोलीसामुळे आपण सुरक्षित आहोत. परंतु त्यांचे जीवन खूपच असुरक्षित आहे. पोलीस हे कर्तव्य निष्ठ असतात.
श्री. संजय पांडे हे सध्या पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य आहेत .
Leave a comment