Nagar Panchayat Karjat election: नगरपंचायत च्या निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अठ्ठावीस अर्ज दाखल
नगरपंचायत च्या निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अठ्ठावीस अर्ज दाखल
Nagar Panchayat Karjat election: कर्जत नगरपंचायत चार जांगासाठी अठ्ठावीस जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
येथील नगरपंचायत च्या चार जागा या ओबीसी वर्गासाठी अरिक्षीत होत्या मात्र सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द करून सर्वसाधारण घेण्याचे निर्देश दिले.त्यानुसार सर्वसाधारण चार जागांवर मतदान घ्यावे लागत आहे. यात दोन महिला आणि दोन पुरुष आहेत.
प्रभाग क्रमांक १ गायकरवाडी सर्वसाधारण महिला
या जागेवर ९ अर्ज दाखल झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्योती लालासाहेब शेळके, जनाबाई लक्ष्मण गायकवाड, द्वारका बाळू वाघमारे तर भाजपतर्फे शीतल बबन फुले, वंदना भाऊसाहेब वाघमारे, संध्या दिपक मांडगे तर शिवसेनेचे पुरकृतउमेदवार संध्या दिपक मांडगे या आहेत.
प्रभाग क्रमांक ३ ढेरे मळा सर्वसाधारण पुरुष
हे पण वाचा : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी,डबल होणार पगार ,जाणून घ्या सविस्तर
या जागेवर १० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
भाजप तर्फे रघुनाथ किसन ढेरे, रावसाहेब पंढरीनाथ खराडे, विजयकुमार दादासाहेब ढेरे तर राष्ट्रवादी तर्फे भुषण रावसाहेब ढेरे, संतोष सोपान मेहत्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर अपक्ष म्हणून संजय नामदेव नेवसे, शांता मुकिंदा समुद्र, योगेश रतन नेवसे, राणी अमोल ढेरे, अविनाश शंकर नेवसे.
प्रभाग क्रमांक ५ पोस्ट ऑफिस सर्वसाधारण महिला
या प्रभागातून ३अर्ज दाखल झाले आहेत
या प्रभागातून भाजपच्या वतीने सारिका गणेश क्षीरसागर तर काँग्रेस पक्षाच्या वतीने रोहिणी सचिन घुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर रोहिणी घुले यांनी अपक्ष ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
प्रभाग क्रमांक ७ बुवा साहेब नगर
या प्रभागातून सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
या प्रभागातून भाजपतर्फे राम निवृत्ती ढेरे, दादासाहेब अर्जुन सोनमाळी यांनी तर राष्ट्रवादी तर्फे सतिश उध्दवराव पाटील, अक्षय शरद तोरडमल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर अक्षय तोरडमल यांना शिवसेनेचे पुरकृत केले आहे. योगिता सोनमाळी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.