Netaji jayanti 2022:देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आगामी १२६ व्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी हा दिवस ‘पराक्रम दिवस’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. नेताजींचा जन्मदिवस आता ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यांच्या बद्दल काही खास गोष्टी घेणार आहोत .
सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. त्यांना नेताजी सुद्धा म्हटले जाते. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगाचा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.