Pimpri chinchwad: पीएमपीएमएल मधील कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी घेराव‌ आंदोलन !

Post by

Pimpri chinchwad: पीएमपीएमएल मधील कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी घेराव‌ आंदोलन !

 Pimpri chinchwad: पीएमपीएमएल मधील कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यां कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा सातवा वेतन‌ आयोग फरकासहीत लागु करणे ,रखडलेली पदोन्नती,रोजंदारी वरील सेवकांना कायम करणे,रोजंदारी सेवकांचा कोरोणा काळातील पगार देणे,इ.तिकिट मशीन‌चा ठेका रद्द करणे, पीएमपीएमएलच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार रोखणे,खासगीकरण करणास विरोध,ई.प्रलंबित मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर यांच्या वतीने राष्ट्रवादी चे पुणे शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पी.एम.पी.एम.एल राष्ट्रवादी कामगार युनियन यांच्या सहकार्याने पुणे महानगरपालिकेला गुरूवार दि.३/०२/२०२२ रोजी सकाळी ठिक १०.०० वा.घेराव‌ घालुन “तीव्र आंदोलन” करण्यात येणार आहे .


Indian Coast Guard: भारतीय तटरक्षक दलात ३२२ पदांसाठी नवीन भरती, 10वी, 12वी पास नोकरी

तरी पीएमपीएमएल कडील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी आपल्या भविष्याचा विचार करुन या आंदोलनात सहभाग घ्यावा असे आवाहन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहरात कुठेही बस संचलन बंद‌ राहु न देता, प्रवाशांची गैरसोय न होता,कोरोणा नियमांचे पालन‌ करून‌ निगडी,पिंपरी,भोसरी या तीनही आगाराकडील सर्व सेवकांनी मोठया संख्येने या आंदोलन‌ सहभागी व्हावे असे आवाहन पीएमपीएमएल राष्ट्रवादी कामगार युनियन पिंपरी चिंचवड विभागाच्या वतीने सुनिल नलावडे,स़ंतोष शिंदे, प्रफुल्ल शिंदे,दिपक गायकवाड,रमेश अर्धिले यांनी केले आहे

Leave a comment