प्रेमसंबंध तोडल्याने महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न, किवळे ता. हवेली येथील घटना
किवळे, ता. हवेली: किवळे येथील रूणाल गेटवे सोसायटीच्या पाठीमागील (Pune News) मोकळ्या रानात एका १९ वर्षीय महिलेला प्रेमसंबंध तोडल्यामुळे जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना दि. २७ मे २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली.
फिर्यादीने (१९ वर्षे, किवळे गाव, ता. हवेली, जि. पुणे) पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी आसिफ मोहम्मद शेख (२४ वर्षे, मुकाई चौक, किवळे, ता. हवेली, जि. पुणे) ह्याच्यासोबत तिचे मागील दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु, फिर्यादीने काही काळापूर्वी हे संबंध पूर्णपणे तोडले होते. ह्या कारणामुळे आरोपीने तिला रस्त्यात आडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
घटनेच्या दिवशी, फिर्यादी कामावरून घरी परतत असताना आरोपीने तिला रुणाल गेटवे सोसायटीच्या पाठीमागील मोकळ्या रानात आडवले. फिर्यादी महार जातीची असल्याचे माहित असूनही, आरोपीने तिला हाताने मारहाण केली आणि जिवे मारण्याच्या उद्देशाने तिचा गळा दाबला. त्यानंतर, त्याने धारदार शस्त्राने तिच्या गळ्यावर आणि हातावर वार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
ह्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तपास अधिकारी आणि अंमलदार यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे.