Latest Marathi News Headlines: मराठी बातम्या - लेटेस्टली covers Latest News, ताज्या बातम्या and Breaking events across the globe, providing information in Marathi on the topics including Sport, क्रीडा, Entertainment,Maharashtra, महाराष्ट्र, India, भारत and World News, Lifestyle, Technology, Automobile, Social and Human values.

RTE admission process:आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज १६ फेब्रुवारी पासून भरता येणार

 

RTE admission process:शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार दि. ०१ फेब्रुवारी २०२२ पासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते. परंतु काही कारणांमुळे  आरटीई पोर्टलवर (On RTE portal) सदरचे अर्ज दि. ०१ फेब्रुवारी २०२२ ऐवजी बुधवार दि. १६ फेब्रुवारी २०२२ पासून भरता येतील, संबंधितांनी या बदलाची नोंद घेऊन अर्ज दाखल करावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड (Education Minister Prof. Varsha Gaikwad) यांनी केले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम १२(१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुले व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

 RTE ऑनलाइन कसा अर्ज करू शकतो? 

  • आरटीई महाराष्ट्र प्रवेश २०२२-२३ साठी  आरटीई महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  •  “नवीन नोंदणी” वर क्लिक करा आता नोंदणी आयडी मिळविण्यासाठी सर्व आवश्यक तपशील भरा.
  •  अर्जाचा उर्वरित भाग पूर्ण करा. 
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि.
  •  पेमेंट करा.
Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel
Leave A Reply

Your email address will not be published.