Shaurya Din 2024 : शौर्य दिवस 1 जानेवारी | शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Shaurya Din 2024 :शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला दरवर्षी 1 जानेवारी शौर्य दिनाच्या निमित्ताने राज्यभरातून सुमारे 5 लाखांहून अधिक लोक अभिवादन करण्यासाठी येत असतात.

 

१ जानेवारी २०१८ शौर्य दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.१८१८ मध्ये या दिवशी फक्त ५०० महार सैनिकांनी २९००० पेशवाई सैन्याचा पराभव करून भारताला जातमुक्त आणि लोकशाहीवादी बनवण्याच्या दिशेने पहिले ऐतिहासिक पाऊल टाकले.

भीमा कोरेगाव चा इतिहास (History of Bhima Koregaon)

ad

भिमा कोरेगावची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी, इ.स. १८१८ रोजी इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशव्यांच्या मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती. या लढाई मध्ये  ८३४ ब्रिटिश सैनिक तर २८,००० मराठा सैनिक होते .इंग्रजांच्या सैनिकांत ‘बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी’चे सुमारे ५०० महार जातीचे सैनिक होते.या युद्धात पराभूत होऊन पेशवाई व मराठा साम्राज्याचा अस्त झाला.
ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर २० शहीद व ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभावर लिहिले आहे — ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’.
हेन्री टी प्रिंसेप यांनी लिहिलेल्या ‘हिस्टरी ऑफ द पॉलटिकल अँड मिलिट्री ट्रान्जॅक्शन्स इन इंडिया’ पुस्तकात या लढाईचा संदर्भ आहे. महार समाजातल्या माणसांचा समावेश असलेल्या ईस्ट इंडिया तुकडीच्या धाडसाचे वर्णन या पुस्तकात आहे.

 

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top