एस टी कर्मचा-यांचा संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे. संपाबाबत हायकोर्टात सुरू असलेली सुनावणी सोमवारी सकाळी 10 पर्यंत स्थगित करण्यात आलीये. शनिवारच्या सुनावणीत कामगारांच्या आत्महत्यांवरून न्यायमुर्ती एस जे काथावाला यांनी राज्य सरकारला सुनावलं. एस टी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. आधी कमिटीचा जीआर काढण्याची मागणी संघटनांनी लावून धरलीय. लवकर तोडगा निघाला नाही, तर 100 टक्के कामगार संपावर जातील, असा इशाराही संघटनांनी दिलाय. – झी २४ तास
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. कारण कामगार संघटना संपावर ठाम आहेत. याप्रकरणी आज हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात तूर्त कोणताही आदेश देत नसल्याचे स्पष्ट करत राज्याच्या महाधिवक्त्यांना सोमवारी या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. त्यामुळं या सुनावणीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.- abp माझा