Latest Marathi News Headlines: मराठी बातम्या - लेटेस्टली covers Latest News, ताज्या बातम्या and Breaking events across the globe, providing information in Marathi on the topics including Sport, क्रीडा, Entertainment,Maharashtra, महाराष्ट्र, India, भारत and World News, Lifestyle, Technology, Automobile, Social and Human values.

Start Up and Innovation:स्टार्ट अप ॲण्ड इनोव्हेशन, स्पर्धेत दादा पाटील महाविद्यालयाच्या संघाची निवड

Start Up and Innovation: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना मिळावी, त्यातून अभिनव कल्पनांचे व्यावसायिकतेत रुपांतर करावे यासाठी ‘ स्टार्ट अप ॲण्ड इनोव्हेशन ‘ कक्ष स्थापन करण्याचे आवाहन केले. त्या अंतर्गत ‘ इनोव्हेशन टू इंटरप्राईज ‘ स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातील पहिल्या फेरीत ३९८ संघ व ७५० विद्यार्थी सहभागी झाले होते. पहिल्या फेरीतून १०० टॉप आयडीयलची निवड तज्ज्ञांनी केली. त्यात दादा पाटील महाविद्यालयाच्या संघाची निवड झाली ,तर दुसऱ्या फेरीत क्लस्टर टीममधून अंतिम २५ संघ निवडले गेले. त्यातदेखील महाविद्यालयाचा संघ पात्र ठरला. या संघाने ‘ महिला सबलीकरण व आरोग्य संवर्धन ‘ या सूत्रानुसार मासिक पाळीच्यावेळी वापरण्यासाठी  महिलांना सुबक व सुलभ पद्धतीने वापरण्यासाठी स्वस्तात आणि आरोग्यदायी ‘ सॅनिटरी पॅड’ बनविण्याचे  प्रात्यक्षिक (Demonstration of making sanitary pads) सादर केले.हा सॅनिटरी पॅड  विघटन न करता त्याचा पुनर्वापर करता येतो ही कल्पना मांडली. त्यामुळे अंतिम फेरीत या संघाची निवड झाली. प्रा.  संतोष क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली…

१. अंजुषा सुखदेव शेळके ( गटप्रमुख )

२.  शुभम दत्तात्रय कदम

३.  मंजूषा सुखदेव शेळके

४. नेहा विजय ननवरे

५.  ओंकार  भूषण ढेरे

या विद्यार्थ्यांनी अंतिम फेरीत धडक मारून दादा पाटील महाविद्यालयाच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवला. या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करीत असताना, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मान.

 राजेंद्रतात्या फाळके यांनी ” कर्जत सारख्या ग्रामीण भागातील दादा पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांचे कौतुक केले, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील गुणवत्ता आणि बुद्धिमत्तेत कोठेही कमी नाहीत हेच यातून सिद्ध झाल्याचे” प्रतिपादन केले. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. संजय नगरकर यांनी या विद्यार्थ्यांना स्टार्ट अप व इनोव्हेशनसाठी महाविद्यालय सर्वतोपरी  मदत करणार असल्याचे जाहीर केले. या यशाबद्दल  र.शि.संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे  सदस्य   मान.आमदार रोहितदादा पवार आणि मान.अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मान. राजेंद्र निंबाळकर व मान.बाप्पासाहेब धांडे, मा. बाळासाहेब साळुंके आदींनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत असून, कर्जतच्या मातीतदेखील प्रतिभेचे अंकुर सुप्त स्वरुपात असल्याची व त्यास योग्य असे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भास्कर मोरे,डॉ. महेंद्र पाटील, आय.क्यू. ए. सी. चे समन्वयक डॉ.संदीप पै, श्रीमंत शेळके व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel
Leave A Reply

Your email address will not be published.