Latest Marathi News Headlines: मराठी बातम्या - लेटेस्टली covers Latest News, ताज्या बातम्या and Breaking events across the globe, providing information in Marathi on the topics including Sport, क्रीडा, Entertainment,Maharashtra, महाराष्ट्र, India, भारत and World News, Lifestyle, Technology, Automobile, Social and Human values.

Umaji Naik : राजे उमाजी नाईक , ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्यक्रांतिकारक

Umaji Naik : राजे उमाजी नाईक , ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्यक्रांतिकारक


Umaji Naik : भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्‍यात आली नाही. १८५७ अगोदर देखील अनेक उठाव झाले. अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरले गेले ते म्हणजे ‘राजे उमाजी नाईक’.

इंग्रज अधिकारी कॅप्टन रॉबर्टसन याने १८२० ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे, “उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार नाही?” तर मॉकिनटॉस म्हणतो, “उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.” हे केवळ गौरवोद्गार नसून हे सत्य आहे … जर इंग्रजांनी कूटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हाच भारताला स्वातंत्र्य लाभले असते.

राजे उमाजी नाईक यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर येथे झाला. त्यांचे वडिल दादोजी खोमणे हे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते.त्यामुळे उमाजीराजेंचे कुटुंब पुरंदर व वज्रगड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. 

Lala Lajpat Rai:लाला लजपतराय,माहित नसणाऱ्या काही खास गोष्टी !

Most Dangerous Animal In The World: जगातील सर्वात धोकादायक प्राणी ,जो चावल्यामुळे जगात होतात सर्वात जास्त मृत्यू

राजे उमाजी नाईक ,मोठे वतनदार, सावकार इंग्रज यांना लुटत असत ,अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करत असत .इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीराजेंना सरकारने इ.स. १८१८मध्ये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत त्यांनी त्याकाळात तुरंगात लिहिणे वाचणे शिकले .या घटनेचे इंग्रज आधिकारी कॅप्टन मॉकिनटॉस याने फार आश्चर्य व कौतुक देखील केले होते .

१५ डिसेंबर १८३१ रोजी उमाजीराजेंना इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्यांना ३५ दिवस ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजीराजे असताना त्यांना पकडणारा इंग्रज अधिकारी कॅप्टन मॉकिनटॉस दररोज महिनाभर त्यांची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीराजेंची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे. उमाजीराजेंवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर राजे उमाजी यांना न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel
Leave A Reply

Your email address will not be published.