voter registration online : मतदान करण्यासाठी आताच नाव नोंदणी करण्याचे आवाहन । मतदार यादीत नाव नोंदणी online ।

Voter Registration 2021
Voter Registration 2021 


1 नोव्हेंबरपासून ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी 1 जानेवारी 2022 हा अर्हता दिनांक आहे. म्हणजे 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारी व्यक्ती आता मतदार म्हणून आपले नाव नोंदवू शकते. मतदार नोंदणीसाठी फक्त निवासाचा आणि वयाचा दाखला; तसेच स्वत:चे छायाचित्र आवश्यक असते. राज्यात राज्य निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या सहकार्यातून व समन्वयाद्वारे व्यापक प्रमाणावर मतदार नोंदणी मोहीम राबविली जात आहे, अशी माहितीही श्री. मदान यांनी दिली.

मतदार नोंदणी (संक्षिप्त पुनरीक्षण) कार्यक्रम

  • प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी:1 नोव्हेंबर 2021
  • प्रारूप मतदार याद्यांवर दावे व हरकती दाखल करणे:30 नोव्हेंबर 2021
  • दावे व हरकती निकाली काढणे:20 डिसेंबर 2021 पर्यंत
  • अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी:5 जानेवारी 2022

आपण हे करू शकतो

  • विधानसभेच्या प्रारूप मतदार यादीतून आपल्या नावाची खात्री करणे
  • 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारी व्यक्ती नाव नोंदवू शकते
  • आपल्या संबंधित मतदार याद्यांतील दुबार/ समान नोंदीदेखील वगळता येतील
  • आवश्यक असल्यास पत्त्यात अथवा नावांत दुरूस्त्याही करता येतील
  • एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाला असल्यास पत्यात बदल करावा
  • आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तीचे नाव वगळावे
  • नाव नोंदविल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करू शकाल

मतदार नाव नोंदणी कुठे कराल? 

  • ऑनलाईन नाव नोंदणीसाठी-www.nvsp.in
  • छापील अर्जाद्वारे नाव नोंदणी- मतदान केंद्र किंवा अन्य निर्देशित ठिकाणे

मतदार नाव नोंदणीसाठीच्या अर्जाचे नमुने

  • प्रथम नाव नोंदणीसाठी किंवा दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतर केले असल्यास: अर्ज क्र. 6
  • अनिवासी मतदाराचे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी: अर्ज क्र. 6अ
  • इतर नावाबाबत आक्षेपासाठी,स्वत:चे किंवा मृत व्यक्तीचे नाव वगळण्यासाठी: अर्ज क्र. 7
  • मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरूस्त्या करण्यासाठी: अर्ज क्र. 8
  • एकाच मतदारसंघातील निवासाचे ठिकाण बदलले असल्यास: अर्ज क्र. 8अ

मतदार नोंदणी साठी लागणारी कागदपत्रे

निवासाचा दाखला (कोणताही एक)

  • जन्म दाखला
  • भारतीय पारपत्र
  • वाहन चालक परवाना
  • बँक/ किसान/ पोस्ट पासबूक
  • शिधावाटप पत्रिका
  • प्राप्तिकर निर्देशपत्रिका
  • पाणी/ दूरध्वनी/ वीज/ गॅस देयक
  • टपाल खात्याद्वारे प्राप्त टपाल/ पत्र

वयाचा दाखला (कोणताही एक)

  • भारतीय पारपत्र
  • वाहन चालक परवाना
  • पॅन कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • 12 वी,10 वी, 8 वी किंवा 5 वीची गुणपत्रिका
  • आधार कार्ड
  • 21 वयोगटावरील प्रथमच नोंदणी करणाऱ्यांसाठी जोडपत्र-3

ऑनलाईन नाव नोंदणीसाठी

  • कागदपत्रे व छायाचित्र दोन एमबीच्या आत असावेत
  • कागदपत्रांची व छायाचित्राची फाईलJPG/ JPEG असावी
Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top