World Hindi Day 2022: का साजरा करतात , जागतिक हिंदी दिन

 

World Hindi Day 2022: का साजरा करतात , जागतिक हिंदी दिन
World Hindi Day 2022

World Hindi Day 2022: जागतिक हिंदी दिवस दरवर्षी १० जानेवारी रोजी साजरा केला जातो. जगात हिंदीच्या संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करणे आणि हिंदीला आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून सादर करणे हा त्याचा उद्देश आहे. परदेशातील भारतीय दूतावास हा दिवस खास साजरा करतात.

आज जागतिक हिंदी भाषा दिन; जगात हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी तसंच तिला आंतरराष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळवून द्यायच्या दृष्टीने दरवर्षी आजचा दिवस जागतिक हिंदी भाषा दिन साजरा केला जातो.

जागतिक हिंदी दिनाचा उद्देश जगात हिंदीच्या संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करणे, हिंदीची आवड निर्माण करणे, हिंदीच्या स्थितीबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि हिंदीला जागतिक भाषा म्हणून सादर करणे हा आहे.

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 10 जानेवारी 2006 हा दिवस दरवर्षी जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून, भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने 10 जानेवारी 2006 रोजी प्रथमच परदेशात जागतिक हिंदी दिवस साजरा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.