Balasaheb Thackeray's statue: 'चोर ते चोरच!' पुतळ्याच्या श्रेयावरून आदित्य ठाकरे मिंधे सरकारवर कडाडले; कोस्टल रोडनंतर आता पुतळ्यावरूनही राजकारण तापलं


 मुंबई: शिवेसना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. मुंबईतील कोस्टल रोडच्या कामाचे श्रेय घेण्यावरून आधीच वाद सुरू असताना, आता वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे श्रेय घेण्यावरून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे.Balasaheb Thackeray's statue


काय आहे प्रकरण? आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर (पूर्वीचे ट्विटर) एक संतप्त पोस्ट केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, ज्याप्रमाणे कोस्टल रोडचे क्रेडिट चोरण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याचप्रमाणे आता बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे श्रेय लाटण्याचे प्रयत्नही केले जात आहेत.


पुतळा कुणी बसवला? आदित्य ठाकरेंचा खुलासा: आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले की, "पुतळ्याची जागा, पुतळ्याचं रूप हे सर्व उद्धव साहेब ठाकरे यांनीच ठरवले होते. इतकेच नाही तर हा पुतळा बसवण्याची जबाबदारी आणि त्याचे पूर्ण मानधन (फी) देखील उद्धव साहेब यांनीच दिले आहे."


मिंधेंच्या आरशात चेहरा तरी स्वतःचा आहे का? सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरेंनी अत्यंत आक्रमक भाषा वापरली. त्यांनी म्हटले की, "कोण किती खोटारडं असू शकतं, हे ह्या निर्लज्जांना पाहून कळतं. पण चोर ते चोरच... ते कधीच सरळ होऊ शकत नाहीत." पुढे त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावताना विचारले, "मिंधेंच्या आरशात त्यांना चेहरा तरी स्वतःचा दिसतो की तोही चोरलेला?"


कोस्टल रोड आणि आता बाळासाहेबांच्या पुतळ्यावरून सुरू झालेल्या या 'क्रेडिट वॉर'मुळे मुंबईतील राजकारण पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post