कर्जत/ ग्रामीण भागातील खेळाडू अतिशय सुंदर खेळ करत असून त्याच्या भविष्य च्या दृष्टीने त्यांना व्यासपीठ उपलब्ध होत नसल्याने खेळाडू यांना त्यांच्या कौशल्य दाखवता येत नाही त्यामुळे च चांगले व्यासपीठ मिळावे यासाठी
पैलवान चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे अध्यक्ष पै. नगरसेवक सचिन घुले यांनी केले.
घुले हे पैलवान चषक स्पर्धां उदघाटन प्रसंगी केले.
यावेळी जिल्हा काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सांळुके म्हणाले की,
पैलवान चषक स्पर्धा ग्रामीण भागाच्या खेळाडूसाठी मोठी पर्वणी असून अशा स्पर्धामुळे खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध होत आहे. प्रवीण घुले मित्रमंडळाचा हा उपक्रम निश्चित कौतुकास्पद आहे. साळुंके पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील खेळाडूसाठी अशा स्पर्धामुळे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याने त्यांची अंगी असणारे विविध कौशल्य, त्यांच्यातील खेळ, खिलाडूवृत्ती पाहण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रवीण घुले मित्र मंडळाचे आभार मानले पाहिजे असे म्हणत खेळ हा खेळाप्रमाणेच खेळावा. जेणेकरून सर्वाना त्यांचा लाभ झाला पाहिजे असे म्हंटले.
यावेळी भामाबाई राऊत, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, जेष्ठ नेते अड कैलाश शेवाळे, नगरसेवक सचिन घुले, राष्ट्रवादीचे सुनील शेलार, सरपंच विजयकुमार तोरडमल आदी उपस्थित होते.
काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत शहरात पैलवान चषक क्रिकेट स्पर्धा प्रवीण घुले मित्रमंडळ यांनी आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उदघाटन शनिवार, दि ३० रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष
यावेळी प्रवीण घुले यांनी मित्रमंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करीत त्यांना धन्यवाद देताना संयोजक असणारी टीम देखील इतर संघाप्रमाणेच नियमानुसार खेळेल. जेणेकरून ज्या संघाचा उत्कृष्ट खेळ असेल तोच पैलवान चषकाचा मानकरी ठरेल. त्यामुळे सर्वाना आपल्या खेळाप्रमाणे न्याय मिळेल आणि उत्कृष्ट संघच खऱ्या विजयाचा मानकरी ठरेल असे म्हणत सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
क्रिकेट स्पर्धा आयोजन करण्याचा मानस प्रवीण घुले मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता. त्यास सर्वच प्रमुख कार्यकर्त्यानी सकारात्मक प्रतिसाद देत “पैलवान चषक” आयोजन करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेसाठी अनेकानी मोठे सहकार्य केले असून त्या सर्वांना धन्यवाद देत प्रविण घुले यांनी आभार व्यक्त केले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रा विशाल मेहत्रे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पैलवान चषकाचा पहिला सामना युनायटेड कर्जत आणि टायगर इलेव्हनमध्ये खेळविण्यात आला. उपस्थित क्रीडाप्रेमींनी या सामन्याचा आनंद लुटला.
या स्पर्धेसाठी अमोल भगत, अमित तोरडमल, नितीन गदादे, अतुल धांडे, विशाल तोरडमल, शेरखान पठाण, विजय मोरे, पिंटू शेलार यांनी उत्तम संयोजन केले असून स्पर्धा यशस्वीसाठी प्रीयेश सरोदे, शिवम कांबळे, राम जहागीरदार, रवी सुपेकर, राजू बागवान, अमोल तोरडमल, दीपक बोराटे, सुजित घोरपडे, विजय तोरडमल, उमेश गलांडे, गणेश लोखंडे, कार्तिक तोरडमल, कार्तिक शिंदे, आदित्य घुले, रिकी पाटील, प्रणित पाटील, अक्षय तोरडमल, माजीद पठाण, इम्रान पठाण, युनूस पठाण, हर्षदीप सोनवणे, स्वप्नील बोरकर, निखिल कोठारी, विकास पवार, भीमा थोरात आदी विशेष परिश्रम घेत आहे.
आपली कुवत पाहून वक्तव्य करावे : शहर अध्यक्ष मनिषा सोनमाळी
मतदारसंघात फिरायला रोहित पवारांना पोलीस बंदोबस्त कशासाठी – दादासाहेब सोनमाळी