चाकण, दि. १२ ऑगस्ट - जमिनीच्या वादातून सावळेवाडी येथे दोन गटात झालेल्या जोरदार हाणामारीत एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता घडली असून, आरोपींनी एका व्यक्तीच्या डोक्यात दगड मारून त्याला जखमी केले. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके काय घडले?
चाकण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गु. रजि.नं. ५७६/२०२५ भा.न्या.सं. कलम ११८(२), ११५(२), ११८(१), ३५२, ३(५) नुसार राजेश हनुमंत काटकर (वय ३९) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांच्या गट नंबर ३२४ या जागेत जेसीबीने काम सुरू असल्याचा जाब विचारण्यासाठी ते गेले होते.
त्यावेळी आरोपी भरत सोपान काटकर, राजेंद्र सोपान काटकर, राहुल एकनाथ काटकर, आणि स्वप्नील एकनाथ काटकर यांनी फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर फिर्यादीचा भाऊ प्रशांत याने त्यांना शिव्या देऊ नका असे म्हटले असता, आरोपी राहुलने लाकडी दांडक्याने प्रशांतच्या उजव्या पायावर जबर मारहाण केली.
ही मारहाण थांबवण्यासाठी राजेश काटकर गेले असता, आरोपी भरत काटकर याने त्यांच्या डोक्यात दगड मारला. यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांची आई तिथे आली असता, आरोपी राजेंद्र काटकर याने त्यांच्या कानशिलात मारली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.