Maharashtra SSC Result 2026 LIVE: दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता! निकालासाठी Direct Link आणि सोप्या स्टेप्स, लगेच तपासा!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE) दहावीचा निकाल अखेर आज जाहीर होत आहे! तब्बल १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. जरी निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सकाळी ११:१५ च्या विभागीय बैठकीपासून सुरू होणार असली, तरी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर दुपारी १ वाजल्यापासून आपला निकाल पाहता येणार आहे. पुणे सिटी लाईव्हच्या या खास रिपोर्टमध्ये पाहा, तुमचा निकाल सर्वात आधी कसा पाहायचा!
निकाल कधी आणि कुठे पाहायचा? (Important Timing)
अधिकृत माहितीनुसार, महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकाल आज, ८ मे २०२६ रोजी जाहीर होत आहे. निकाल पाहण्यासाठीची अधिकृत लिंक दुपारी ११ :३ ० वाजता (1:00 PM) सक्रिय होईल. विद्यार्थी mahresult.nic.in, mahahsscboard.in आणि sscresult.mkcl.org या अधिकृत संकेतस्थळांवर आपला रिझल्ट पाहू शकतात. मंडळाने यंदा कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेतल्याने निकालाची टक्केवारी कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निकाल पाहण्यासाठी सोप्या स्टेप्स (How to Check SSC Result)
१. सर्वात आधी 'mahresult.nic.in' या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. होमपेजवर 'SSC Examination March 2026 Result' या लिंकवर क्लिक करा.
३. आता तुमचा हॉल तिकीटवर असलेला 'Seat Number' आणि 'Mother's Name' (आईचे नाव) टाका.
४. माहिती भरल्यानंतर 'View Result' या बटणावर क्लिक करा.
५. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंट आऊट किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा.
SMS आणि DigiLocker वरही निकाल उपलब्ध
वेबसाइटवर ट्रॅफिक जास्त असल्यास विद्यार्थी SMS द्वारेही निकाल मिळवू शकतात. यासाठी MHSSC <space> <Seat Number> टाईप करून ५७७६६ या क्रमांकावर पाठवा. तसेच, अधिकृत गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे 'DigiLocker' ॲपवरूनही डाउनलोड करता येतील. पुणे विभागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.
दहावीचा निकाल हा जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, पण तो शेवटचा नाही. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे 'पुणे सिटी लाईव्ह'तर्फे हार्दिक अभिनंदन! तुम्हाला किती टक्के मिळतील असे वाटते? किंवा तुमच्या निकालात काही अडचण येत आहे का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा लेख तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!