Amrit Jawan Sanman Abhiyan: सैनिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावे यासाठी , अमृत जवान सन्मान अभियान उदघाटन
Karjat : देशांची सेवा केलेल्या तिन्ही सैन्य दलातील माजी सैनिक, शहिद जवान व सेवेत कार्यरत सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून निस्वार्थीपणे देशाची सेवा केली आहे व करत आहे. त्याची सेवा – समर्पण विचारात घेता सर्व सैनिकांचे मनोबल उचविण्यासाठी व त्यांचा उचित सन्मान करण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर (Collector Ahmednagar) यांनी आजी-माजी सैनिकांसाठी विविध विभागातील शासकीय कामे जलदरीत्या व प्राधान्याने सोडविण्यासाठी “अमृत जवान सन्मान अभियान” २२ (Amrit Jawan Sanman Abhiyan) राबविले असून कर्जत तालुक्यातील सर्व सैनिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावे यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी कर्जत येथील पंचायत समिती च्या सभागृहात अमृत जवान सन्मान अभियान उदघाटन प्रसंगी केले.
यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे, अव्वल कारकून परशुराम होगले, तलाठी सुनील हसबे माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ, बनसोड, सत्यवान शिंदे, भाऊसाहेब आगवण, भानुदास हाके,सचिन मोरे रमजान शेख यांच्यासह आदी माजी सैनिक उपस्थित होते.
Karjat – Jamkhed : मधील या गावांना मिळणार 25 लाख रुपये
यावेळी पुढे बोलताना प्रांताधिकारी डॉ थोरबोले म्हणाले की, कर्जत तालुक्यातील माजी सैनिकांना येणाऱ्या अडी-अडचणी, समस्या यासह विविध विभागात असणारे प्रलंबित प्रश्न कर्जत तालुका प्रशासन तात्काळ कसे सोडविले जातील यासाठी कटीबद्ध आहे. अमृत जवान सन्मान अभियान यात उपलब्ध होणारे सर्व प्रश्न प्रशासन निकाली काढेल अशी हमी थोरबोले यांनी आजी-माजी सैनिकांना दिली. देशसेवेत जवानांनी केलेले कार्य फार मोठे असून त्यांचे कार्य करण्याची संधी या अभियानाद्वारे प्रशासनास मिळत असल्याचे समाधान व्यक्त केले.
गटविकास अधिकारी अमोल जाधव या वेळी म्हणाले की ७५ वर्ष झाले तरीही देश सेवा केलेल्या माजी सैनिक यांचे प्रश्न निकाली निघाले नाहीत. ते आता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या पुढाकाराने नगर जिल्ह्यातील माजी सैनिकांचे प्रश्न मार्गी लागतील अशी आशा व्यक्त करत जिथे सेवा भाव असतो तिथे कारणे नसतात तुमचे कामे करण्याची जबाबदारी आमची जबाबदारी आहे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी, परीक्षेला येतील यातीलच प्रश्न !
यावेळी उपस्थित असणाऱ्या माजी सैनिकांनी आणि त्यांच्या कुटुंबियाच्या सदस्यांनी मनोगत व्यक्त करीत प्रशासनास धन्यवाद दिले. यासह उपस्थित होणारे प्रश्न तात्काळ मार्गी लावत न्याय द्यावा अशी मागणी केली. यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी याचा लाभ घेत आपली आर्थिक उन्नती साधण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवासी नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे यांनी केले.