Dada Patil College :रयत शिक्षण संस्थेच्या येथील दादा पाटील महाविद्यालयातील प्रा. संतोष क्षीरसागर( रसायनशास्त्र), प्रा. सुजित म्हस्के (भौतिकशास्त्र), प्रा. सुप्रिया साळुंके( भौतिकशास्त्र), प्रा.श्रीमती शिल्पा तोडमल (इलेक्ट्रॉनिक्स )व प्रा. धनंजय कदम (भूगोल )हे सर्वजण एकाच वेळी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.युजीसी नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार सहाय्यक प्राध्यापक पदावर नेमणूक होण्यासाठी सेट किंवा नेट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत या सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत सर्व प्राध्यापक उत्तीर्ण झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.संजय नगरकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या यशा
बद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार व अंबादास पिसाळ ,दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजेंद्र निंबाळकर व बप्पासाहेब धांडे यांच्यासह सर्व स्टाफने त्यांचे अभिनंदन केले .या सत्कार प्रसंगी उपप्राचार्य डॉ. महेंद्र पाटील, प्रा.भास्कर मोरे, डॉ. संजय ठुबे,आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक डॉ.संदीप पै, प्रा. भागवत यादव , डॉ.प्रमोद परदेशी व डॉ.अशोक म्हस्के हे उपस्थित होते.