photo – unsplash |
Karjat : सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव (obscene gestures) करणाऱ्या तीन महिलांसह वेगळ्या अवस्थतेत मिळून आलेल्या एका तरुणावर कर्जत (Karjat ) पोलिसांनी दि.८ रोजी सायंकाळी कारवाई केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी,’कर्जत शहरातील कोळीगल्ली येथील जनाबाई गोविंद दवणे यांच्या घरासमोरील रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी थांबून काही महिला येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे पाहून अंगप्रदर्शन व अश्लील हावभाव करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त महितीदारकडून मिळाली होती.
ही माहिती समजताच पोलीस निरीक्षक यादव यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सदरची हकीगत कळवून साहाय्यक पोलीस पोलिस निरीक्षक भगवान शिरसाठ यांना दोन पंचांसह कर्जत पोलीस ठाण्यात हजर होण्यास सांगितले. त्यानंतर पंचांना हकीगत सांगून पंचानीही बरोबर येण्यास संमती दिली. पोलीस पथकाने तात्काळ पंचांसह खाजगी वाहनातून घटनेतील नमुद ठिकाणी जाऊन खात्री केली असता जनाबाई गोविंद दवणे यांच्या घरासमोर सार्वजनिक ठिकाणी दोन महिला अंगप्रदर्शन व अश्लील हावभाव करताना दिसुन आल्या.व एक महिला व एक पुरुष याच सार्वजनिक ठिकाणी वेगळ्या अवस्थेत पोलिसांना मिळून आले.त्याच वेळी पोलिसांनी महिला व पुरुषाना सायंकाळी ५.३० वाजता ताब्यात घेऊन रस्त्यावर अश्लील हावभाव करणाऱ्या महिलांना त्यांची नावे-गावे विचारली. पंचासमक्ष त्यांना ताब्यात घेऊन सदरील रस्त्याच्या कडेला पंचासमक्ष पाहणी केली असता त्या ठिकाणी १२ निरोधची पाकिटे (अंदाजे किंमत २४० रु.) असा मुद्देमाल आढळून आला आहे.महिला पोलीस नाईक जयश्री गायकवाड यांच्या फिर्यादीवरून चारही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर बाबत परिसरातील नागरिकांच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या.
कर्जत नगर पंचायत: कर्जत नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा पदी उषा अक्षय राऊत संपूर्ण बिनविरोध निवड
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिरसाठ,महिला पोलीस नाईक जयश्री गायकवाड, मनोज लातूरकर, राणी पुरी, ईश्वर माने, शाहूराज तिकटे आदींनी केली आहे.