Maharashtra HSC Hall Ticket 2022 : बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध ,असे करा डाउनलोड

Maharashtra HSC Hall Ticket 2022: हे लक्षात घेण्यासारखे आहे की महाराष्ट्र बोर्ड HSC हॉल तिकीट 2022 परीक्षेला बसण्यासाठी तसेच परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी आवश्यक आहे. हॉल तिकीटाशिवाय उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. बोर्डाने अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केल्यावर उमेदवारांनी महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 12 वी हॉल तिकीट 2022 शाळेतून घेतले पाहिजे आज दुपारी एक वाजल्यापासून  बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध असणार आहे .

Maharashtra HSC Hall Ticket 2022 डाउनलोड कसे करायचे ?

बारावी बोर्डाचे ऑनलाइन हॉल तिकीट www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे. दरम्यान हॉलतिकीट मिळवताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधायचा असल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्याकडून त्यासाठी कोणतेही शुल्क न घेता सदर हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.