prajasattak din bhashan marathi: प्रजासत्ताक दिन निमित्त खास मराठी भाषण

prajasattak din bhashan marathi


ad

 Republic Day:हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘प्रजासत्ताक दिन’ हा होय. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जतो. आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो.

या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे आयोजित केले जाते .

दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते.या संचलनामध्ये सर्व सरकारी संघटना पोलीस दले ,NCC ,NSS तसेच पोलीस सामील होत असतात .यादिवशी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा राष्ट्रपतिंच्या हस्ते सत्कार होतो .

हा कार्यक्रम पाहण्यासारखा असतो ,याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन वर दाखवले जाते .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *