Republic Day Poetry Marathi: प्रजासत्ताक दिन कविता मराठी – वैभवी दळवी

 Republic Day Poetry Marathi: प्रजासत्ताक दिन कविता मराठी – वैभवी दळवी 

Republic Day Poetry Marathi: प्रजासत्ताक दिन कविता मराठी - वैभवी दळवी

विजय आपल्या तिरंग्याचा, आज सजला
 नतमस्तक त्या सर्वांना
ज्यांनी भारताचा इतिहास घडवला.
देश विविध रंगांचा
देश विविध ढंगांचा
मातृभूमी ही अक्षय
साऱ्या देशात सुसंस्कृती 
वर्णनीय हीचा इतिहास
सर्व जाती धर्माचे इथे नांदती
अर्थपूर्ण असा हा ध्वज तुझ्या सेवेसाठी 
माते आम्ही सदैव सज्ज
जीवन आमचे जाहले धन्य
भारतीय नागरिक होऊन सार्थक झाले जन्माच
माझ्या देशाला वंदून.
कविता – वैभवी दळवी 

ad

 महागडी आजादी  
१५० वर्षांच्या गुलामी नंतर तिरंगा मानाने सजला 
संपूर्ण भारत आज नटला महागडया आजादी चा महान इतिहास आज दिसला ॥
सोन्याची सूरी असणाऱ्या भारत देशात ब्रिटिशांनी सत्ता गाजवली, 
आपल्याच देशात आपल्या लोकांवर त्यांनी तलवार नाचवली ॥
कुटुंबाचा विचार न करता मावळ्यांनी संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्यांचे पाहिले।
 घ्या आजादी पाई भारत भूमित असंख्य रक्ताचे पाठ वाहिले ॥
कविता – वैभवी दळवी 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *