Hindi ocean: हिंदी महासागरात सागरी उष्णता कालावधी वाढल्याचा मान्सूनवर परिणाम

Hindi ocean: हिंदी महासागरात सागरी उष्णता कालावधी वाढल्याचा मान्सूनवर परिणाम


 Hindi ocean: हिंद महासागरात सागरी उष्णता कालावधीचे प्रमाण  वाढत असून  त्याचा भारतातील  मान्सूनवर परिणाम होत आहे, असे पुणे स्थित भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (IITM) रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी केलेल्या अभ्यासात म्हटले आहे.

‘जेजीआर ओशन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात, संशोधकांनी सागरी उष्णता  घटनांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे.  हिंदी महासागराच्या तापमानात  वेगाने झालेली  वाढ आणि प्रबळ अल  निनो यांचा  हा परिणाम आहे. अभ्यासात असे आढळून आले की सुमुद्राचे तापमान वाढण्याच्या घटना या  मध्य भारतीय उपखंडातील पाऊसमान कमी तर दक्षिण द्वीपकल्पातील  पाऊसमान  वाढवतात .

सागरी उष्णता  प्रसंग / कालावधी म्हणजे काय ?

सागरी सागरी उष्णता  घटना / प्रसंग हा समुद्रातील अत्यंत उच्च तापमानाचा कालावधी (90 पर्सेन्टाइल पेक्षा अधिक ) असतो.  या घटनांमुळे प्रवाळांच्या रंग बदलतो, सागरी गवत नष्ट होते आणि समुद्रातील शैवालवनांचा नाश झाल्यामुळे  अधिवास उध्वस्त होतो, ज्याचा  मत्स्यपालन  क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होतो. पाण्याखाली केलेल्या   सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की मे 2020 मधील सागरी उष्णतेच्या घटनेनंतर तामिळनाडू किनार्‍याजवळील मन्नारच्या आखातातील 85% प्रवाळाचा  रंग बदलला आहे. मात्र  अलीकडील अभ्यासांमधून जागतिक महासागरांमध्ये सागरी उष्णतेच्या वाढत्या घटना  आणि त्याचे परिणाम नोंदवले असले तरी,  उष्णकटिबंधीय हिंदी महासागर प्रदेशात त्या  कमी आढळतात.



Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment